पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महिलांना पैसे वाटले, फडणवीस म्हणतात, चांगल्या योजना आणायला तुम्हाल
बिहार निवडणूक निकाल 2025: बिहार विधानसभेच्या निवडणुकीत (Bihar Election Result 2025) एनडीएने (NDA) मोठा विजय मिळवत तब्बल 202 जागा जिंकल्या आहेत. विरोधकांच्या महागठबंधनला अवघ्या 35 जागांवर विजय मिळवण्यात यश आले. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत विरोधकांना मोठा धक्का बसलाय. बिहार निवडणुकीच्या निकालावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना बिहारमधील महिलांना त्यांच्या खात्यात 10 हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप करणं हे योग्य आहे का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही (Election Commission) गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे, अशी टीका केली. आता शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जेता वही सिकंदर : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जो जीता वही सिकंदर. हरल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारायला हवा. मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत, आत्मपरीक्षण करायला हवं. पण आत्मपरीक्षण करणं हे विरोधी पक्षांना मान्य नाही. तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही योजना का आणल्या नाहीत? आम्ही ज्या योजना आणल्या त्या लोकांना आवडल्या. त्यावर लोकांनी मतदान केलं तर लोकांना दोष देण्याचं कारण काय? असे प्रतिक्रिया त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर दिली आहे.
Sharad Pawar on Devendra Fadnavis: नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
बिहार निवडणुकीच्या निकालावर शरद पवार म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीचे मतदान झाले. त्यानंतर मी काही लोकांशी बोललो. त्यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की बिहारच्या निवडणुकीत मतदान महिलांनी हातामध्ये घेतले होते. एक अशी शंका होती, ज्या अर्थी महिलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतला, याचा अर्थ महिलांना त्यांच्या खात्यात 10 हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असावा. महाराष्ट्रात देखील निवडणुकीच्या आधी अधिकृत पैसे वाटले, प्रत्येक मताला पैसे देतात तसे नाही, तर सरकारच्या वतीने योजनेच्या माध्यमातून पैसे दिले म्हणजेच लाडकी बहीण योजना. यापुढील निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा प्रकारे पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका घेतली तर निवडणुकीच्या प्रक्रियेवरील लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करणे योग्य आहे का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगाने देखील याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
34 वय झालंय तरी लग्न जुळना, शरद पवारांना पत्र लिहिणारा मंगेश काय म्हणतो, शिक्षण किती, काय करतो?
आणखी वाचा
Comments are closed.