नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची दिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हत्या
नागपूर : उत्तर नागपूरातील भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या करण्यात आल्याने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. यशोधरा पोलीस स्टेशन स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस परिसरात धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. सचिन साहू असं मृत भाजप कार्यकर्त्याचं नाव असून तो उत्तर नागपुरातील वार्डचा अध्यक्ष होता. जुन्या पैशाच्या देवाण-घेवाणच्या वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
हत्या करण्यात आलेल्या मृतक सचिनच्या मुलाचा आज वाढदिवस होता, मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीचे साहित्य आणण्यासाठी बाहेर गेला असता वाटतेच कांजी हाऊस परिसरात त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलीस स्टेशमध्येही गर्दी जमा झाली आहे. सचिनला ठार करणारे, मारेकरी नेमके कोण होते? हत्येमागाचे नेमके कारण काय? याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी आजूबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासातून आरोपीचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे आहे. त्यानुसार, तीन ते चार जणांनी हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.
दरम्यान, सचिन शाहूचा गणपती उत्सवात काही लोकांशी वाद झाला होता, त्यामुळे याच्या हत्येमागे त्या लोकांचा समावेश असल्याचा संशय मृतकाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. पोलिसांचा त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.