धक्कादायक! ट्रान्सजेंडर गँगकडून तरुणाचं अपहरण, जबरदस्तीने जेंडर सर्जरी केल्याचा गंभीर आरोप
मुंबई मालाड क्राईम न्यूज : मुंबईच्या मालाडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मालाड ट्रान्सजेंडर गँगकडून महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करण्यात आले आहे. मालाडमध्ये 19 वर्षीय तरुणाचे अपहरण करुन त्याला ब्लॅकमेल आणि जबरदस्तीने जेंडर सर्जरी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नेहा खान उर्फ नेहा इप्टे आणि तिच्या साथीदारांनी दबाव, मारहाण आणि अश्लील व्हिडिओद्वारे धमकावल्याचा दावा करण्यात आला आहे.
आरोपींनी तरुणाला सूरतच्या रुग्णालयात नेऊन अनिच्छेने जेंडर बदल शस्त्रक्रिया केल्याचा आरोप
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबरला आरोपींनी तरुणाला सूरतच्या रुग्णालयात नेऊन अनिच्छेने जेंडर बदल शस्त्रक्रिया केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भिक्षा मागण्यास भाग पाडणे, पैसे उकळण्याचा प्रयत्न आणि सततच्या धमक्या दिल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. पीडिताने 4 नोव्हेंबरला पळून सुटका करुन घेतली, त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मालवणी पोलिसांनी अपहरण, ब्लॅकमेल, जबरदस्ती आणि वैद्यकीय अत्याचारासह अनेक कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहेत तर; रुग्णालय रेकॉर्ड आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.
तक्रारीत नेमकं काय केलं नमूद?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबर 2025 ला मालाड येथील ट्रान्सजेंडर गँगच्या आरोपींनी तरुणाला सूरतच्या रुग्णालयात नेले होते. त्यानंतर त्या तरुणाच्या इच्छेविरुद्ध जाऊन आरोपींनी त्याचे जेंडर बदलत शस्त्रक्रिया केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीत आहे. यासोबतच पीडित तरुणाने आणखी काही का धक्कादायक आरोप देखील केले आहेत. यामध्ये सतत भिक्षा मागण्यास भाग पाडण्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. त्याचबरोबर पैसे उकळण्याचा प्रयत्न आणि सततच्या धमक्या दिल्याचा आरोप पोलिसांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी दबाव, मारहाण आणि अश्लील व्हिडिओद्वारे धमकावल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. पीडित तरुणाने पोलिसांकडे दिलेल्या या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. या तरुणाची पोलिसी कसून चौकशी देखील करत आहेत. या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? याबाबत देखील पोलीस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, ज्या रुग्णालयात तरुणाच्या इच्छेविरुद्ध जाऊन आरोपींनी त्याचे जेंडर बदलत शस्त्रक्रिया केली आहे, त्या रुग्णालयाचे रेकॉर्ड तपासण्याचं काम केली सुरु करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Munjya : वडिलांचा मृत्यू, घर विकलं, ट्रान्सजेंडर बनून रस्त्यावर राहिला; 100 कोटींचा चित्रपट देणाऱ्या अभिनेत्याची संघर्षगाथा
आणखी वाचा
Comments are closed.