म्हणून माझ्या मुलाला उमेदवारी घेण्यापासून थांबवलं; शिंदे गटाच्या राजन साळवींचं स्पष्टीकरण


राजन साळवी: रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत (Ratnagiri Nagar Parishad Election) शिवसेना (शिंदे गट) घेतलेल्या एका निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष राजन साळवी (Rajan Salvi) यांचा मुलगा अथर्व साळवी (Atharva Salvi) यांना प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे या निर्णयाचा मोठा फटका राजन साळवी यांना बसल्याचे चित्र दिसत आहे. तर मुलाला उमेदवारी न मिळाल्याने राजन साळवी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता यावर राजन साळवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Rajan Salvi: नेमकं काय म्हणाले राजन साळवी?

रत्नागिरी नगर परिषदेची जागा माहितीच्या वाट्यात शिवसेना पक्षाला येत नसल्याने मी माझ्या मुलाला उमेदवारी घेण्यापासून थांबवलं असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते राजन साळवी यांनी केलं. 35 वर्षापासून रत्नागिरीची ती जागा शिवसेनेच्या वाट्याला येत असल्याने आम्ही ती जागा मागितली होती. मात्र, महायुती आमच्या वाट्याला येत नसल्याने मी माझ्या मुलाला थांबायला सांगितलं असल्याचं सांगत मी उमेदवारीवरून नाराज नाही. नाराज असतो तर घरी बसलो असतो असं स्पष्टीकरण राजन साळवे यांनी दिले.

Rajan Salvi on Uday Samant: आमच्या पक्षात कुरघोडी होत नाही

दरम्यान, प्रभाग क्रमांक 15 मधूनच राजन साळवी यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीचे नगराध्यक्षपद देखील राजन साळवी यांनी भूषवले आहे. तर राजन साळवी यांचा मुलगा अथर्व राजन साळवी हा प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक होता. मात्र शिवसेनेने राजन साळवी यांच्या मुलाला रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारली. अथर्व साळवी यांना उमेदवारी न मिळाल्याने राजन साळवी नाराज असल्याची चर्चा रंगली होती. रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत मुलाला उमेदवारी नाकारल्यानंतर मंत्री उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात शीतयुद्ध रंगणार का? अशी कुजबुज सुरु होती. यावर बोलताना राजन साळवी यांनी उदय सामंत पालकमंत्री व आमचे नेते असल्याने आमच्या पक्षात कुरघोडी होत नसल्याचा निर्वाळा दिलाय.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Kagal : कागलचं राजकारण 24 तासात फिरलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; कट्टर विरोधक मुश्रीफ-समरजीत घाटगेंचा तह, शिंदेंची शिवसेना एकाकी

Palghar News: मोठी बातमी! विरोधकांकडून टीकेची झोड उठताच काशिनाथ चौधरींच्या भाजप पक्षप्रवेशाला स्थगिती; प्रदेशाध्यक्षाचे आदेश

आणखी वाचा

Comments are closed.