जेव्हा संधी मिळाली, तेव्हा सिद्ध केलं… तरीही बाहेर; गंभीर आणि आगरकरमुळे 3 खेळाडूंची करिअर उद्
भारतीय क्रिकेट संघाचा हेड कोच झाल्यानंतर गौतम गंभीर अनेक मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. या निर्णयांमध्ये त्याला मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचाही ठाम पाठिंबा मिळतो. गंभीर–आगरकर ही जोडी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलते आहे, पण त्याचबरोबर काही स्टार खेळाडूंचे करिअर बर्बाद केल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहे. काही खेळाडू सतत उत्कृष्ट प्रदर्शन करुनही संघाबाहेर आहेत. एखादा खेळाडू सध्या संघात असूनही त्याला योग्य संधी मिळत नाही, म्हणून त्याचे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.
1. ऋतुराज गायकवाड
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड तिन्ही फॉर्मेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. महाराष्ट्रासाठी आणि इंडिया अ साठी त्याने अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली. मागच्या 4 सामन्यांमध्ये तर तो प्लेयर ऑफ द मॅच ठरला आहे. तरीही त्याची टीम इंडिया मध्ये पुनरागमनाची वाट अडलेलीच आहे. टी20आय मध्ये त्याचे आकडे उत्कृष्ट असतानाही त्याला परत बोलावलं जात नाही. चाहते म्हणतात की, यामागेही गंभीर–आगरकर यांची जोडीच कारणीभूत आहे.
2. सरफराज खान
मध्यक्रमातील दमदार फलंदाज सरफराज खान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघात होता, पण एकाही सामन्यात न खेळवता त्यांना इंग्लंड मालिकेतून बाहेर करण्यात आले. संघाबाहेर गेल्यानंतर सरफराजने इंडिया अ कडून शानदार खेळ करत सातत्य दाखवले. तरीही त्याला भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळाली नाही. दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या मालिकेत तर त्याला इंडिया अ च्या संघातसुद्धा स्थान दिलं नाही. चांहत्याचा आरोप असा की, सरफराजच्या घसरत्या करिअरमागे गौतम गंभीर आणि अजीत आगरकर ही जोडीच जबाबदार आहे.
3. संजू सॅमसन
टीम इंडियाचा विकेटकीपर–फलंदाज संजू सॅमसन सध्या टी20आय संघाचा भाग असला, तरी तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. शुभमन गिल संघात आल्यानंतर सॅमसनकडून सलामी फलंदाजीची जागा काढून घेतली, आणि त्याला मधल्या क्रमांकावर ढकवण्यात आले. तिथे काही सामने अपयशी ठरल्यानंतर त्याला थेट बाहेर बसवण्यात आलं. सॅमसनने सलामी फलंदाज म्हणून टी20मध्ये भेदक कामगिरी केली आहे. वनडेतसुद्धा तो चांगला खेळला, पण तरीही त्याला भारतीय संघात जागा मिळत नाही. यासाठीही फॅन्स गौतम गंभीर आणि अजीत आगरकर यांनाच जबाबदार धरत आहेत.
हे ही वाचा –
Ravichandran Smaran : कवडीमोल दराने विकत घेतलेला ‘तो’ खेळाडू हिरा निघाला, रणजी स्पर्धेत धुमाकूळ घातला, काव्या मारनला लागली लॉटरी
आणखी वाचा
Comments are closed.