भाजपच्या उमेदवारांसाठी दोन काउंटर; चंद्रपुरात मुनगंटीवार-जोरगेवार वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर


चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक 2025: चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक अगदी तोंडावर आहे. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चंद्रपूर भाजप अंतर्गत असलेला सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांना प्रदेश भाजपच्या वतीने महानगरपालिकेसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. सोबतच प्रदेश भाजपकडून चंद्रपूर भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांना इच्छुक उमेदवारांचे आवेदन स्वीकारण्यास सांगितलं आहे. त्याप्रमाणे सुभाष कासनगोट्टूवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांना आवेदन सादर करण्यास सांगितलं.

Chandrapur BJP : भाजपच्या दोन नेत्यांमधील वाद, कार्यकर्ते संभ्रमात

मात्र त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या गटाचे माजी चंद्रपूर शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी देखील सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावे, असं आवाहन केलं आहे. राहुल पावडे यांनी इच्छुक उमेदवारांना सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात अर्ज सादर करण्यासाठी केलेल्या आवाहनाला भाजपच्या वर्तमान शहराध्यक्षांनी तीव्र आक्षेप घेत पावडे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहे. तर या प्रकरणावर सुधीर मुनगंटीवार गटाचे राहुल पावडे यांनी काहीही बोलण्यास नकार दिलाय. मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या दोन नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहे.

Kishor Jorgewar : रस्त्याचं भूमिपूजन करायला आलेल्या किशोर जोरगेवारांना विरोध करा

चंद्रपूर : रस्त्याचं भूमिपूजन करायला आलेल्या आमदाराला काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचा प्रचंड विरोध करण्यात आला आहे. मोठ्या वादावादीनंतर अखेर आमदाराने भूमिपूजन उरकलेहे. दलित वस्ती सुधारणा योजनांतर्गत चंद्रपूर शहरातील डिस्पेंसरी चौकात रस्त्याचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते काल रात्री भूमिपूजन झालं होते. फक्त ज्या रस्त्याचे भूमिजन आमदार करायला आले त्या रस्त्याची मंजुरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळाली आणि त्याचे सत्तर टक्के काम पूर्ण झाल्यावर आता नव्याने त्याच रस्त्याचे भूमिपूजन कशाला? असा सवाल करत काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेश अडुर यांनी गोंधळ घातला.

गडचिरोली: गडचिरोलीतील तीन नगरपालिकात 430 उमेदवारी अर्ज, नगराध्यक्ष पदासाठी 35 अर्ज

गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, आणि देसाईगंज या तीन नगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत गडचिरोली नगरपालिकेत 106 उमेदवारी अर्ज तर आरमोरी नगरपालिकेत 132 आणि देसाईगंज नगरपालिकेत सुद्धा 132 असे 430 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी गडचिरोलीत 13 तर आरमोरीतही 13 आणि देसाईगंज मध्ये 9 असे 35 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज अर्जाची छाननी होणार असून कोणाच्या अर्ज बाद ठरतो याकडे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.