12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा
नाशिक : माझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेलाय असं म्हणत बारावीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर तीन ते चार मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणींनी दगडफेक केल्याची धक्कादाय घटना नाशिकमध्ये घडली. नाशिकच्या (Nashik) सातपूर परिसरात दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीडित तरुणीचे एका अन्सारी मुलाबरोबर मैत्री होती. मात्र, ही मैत्री तोडल्यामुळे अन्सारीने एका मैत्रिणीच्या माध्यमातून पीडित महिलेस संपर्क साधला.
या मुलीने आपल्या महाविद्यालयातील ओळखीच्या मुलांना याबाबत माहिती दिल्यानंतर या मुलांनी त्या मुलाला जाब विचारत गोंधळ घातला. यावेळी मुलाची आणि अन्सारींची हाणामारी झाली आणि यातून या मुलाला जेलमध्ये जावं लागलं. या कारणामुळे अन्सारीच्या मैत्रिणीने मनात राग ठेवून या मुलीला मारहाण करत तिच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीदरम्यान शिवीगाळही केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पीडित मुलीच्या घरच्यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या मुलींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबाने केली आहे. अन्सारीवर या आधी देखील गुन्हे दाखल असल्याचं पीडितेच्या वडिलांनी सांगितल आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे.
मालेगावमध्ये चिमुरडीची हत्या, सुवर्णकार समाज संतप्त
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या भयंकर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ लासलगाव येथील सुवर्णकार समाजाने मूक मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला लासलगाव येथील शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढत सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन दिले..यावेळी आरोपीवर तातडीने फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरातील कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी..अशी ठाम मागणी यावेळी महिलांनी केली यानंतर ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने लासलगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले..यादरम्यान त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली..
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.