मोठी बातमी : उज्वला थिटे यांचा अर्ज बाद, अनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट


सोलापूर अंगार नगर पंचायत बातम्या: मागील अनेक वर्ष राष्ट्रवादीत राहिलेल्या आणि काही महिन्यांपूर्वीच भाजपत (BJP) प्रवेश केलेले मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या अनगर गावातील नगरपंचायतीची निवडणूक सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. यासंदर्भात आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उज्वला थिटे ( Ujjwala Thite)  यांचा अर्ज बाद झाला आहे. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे याच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे.

उज्वला थिटे यांच्या अर्जाला सूचकाची सही नसल्याने अर्ज बाद

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थेटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. उज्वला थिटे यांच्या अर्जाला सूचकाची सही नसल्याने अर्ज बाद झाला आहे. दरम्यान अनगर नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे हे दोन अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळं नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. पण 21 तारखेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत असल्याने अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे आपला अर्ज माघार घेतात की कायम ठेवतात यावर पुढील चित्र अवलंबून असणार आहे. मात्र सर्वाधिक चर्चा झालेली राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध भाजप ही लढत होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या सगळ्यांनंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि उज्वला थिटे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.

अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थेटे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला असता तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा सामना झाला असता. मात्र, उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.  माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील विरुद्ध उज्वला थिटे असा सामना होणार होता. दरम्यान, उज्वला थिटे यांनी काल पोलीस संरक्षणात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  मात्र अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याची माहिती तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळे यांनी दिली आहे.

भाजप नेते राजन पाटील यांच्या नेतृत्वातील 17 पैकी 17 नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध

एकीकडे भाजप नेते राजन पाटील यांच्या नेतृत्वातील 17 पैकी 17 नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी असले तरी माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. मागील अनेक वर्ष राष्ट्रवादीत राहिलेल्या आणि काही महिन्यांपूर्वीच भाजपत प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या अनगर गावातली ही निवडणूक सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे.

महत्वाच्या बातम्या:

आधी अनगरमध्ये बिनविरोध 17, आता जळगावमध्येही कमळ खुललं; 3 जागांवर भाजपचे उमेदवार जिंकले

आणखी वाचा

Comments are closed.