नगराध्यक्षपदाचा अर्ज बाद झाला, आता पुढे काय? उज्वला थिटेनी सांगितलं राज’कारण’
मोहोळ अंगार नगर पंचायत उज्ज्वला थिटे न्यूज : अनगर नगरपंचायतीच्या (Angar Nagar Panchayat) नगराध्यक्ष पदासाठी उज्वला थिटे (Ujjwala Thite) यांचा अर्ज बाद झाला आहे. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे याच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्वला थिटे यांनी पाहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उज्वला थिटे यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या उज्वला थिटे?
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उज्वला थिटे यांनी दिली आहे. अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची आणि अर्जाची वकिलाकडून तपासणी केली होती. सूचक म्हणून माझा मुलगा माझ्यासोबत होता, त्याचीच सही कशी राहू शकते? असा सवाल उज्वला थिटे यांनी केला. मी न्यायाल्यावर विश्वास ठेवते, अर्ज कसा बाद झाला? यासंदर्भात मी न्यायालयात दाद मागेन असे थिटे म्हणाल्या.
उज्वला थिटे यांच्या अर्जाला सूचकाची सही नसल्याने अर्ज बाद
संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थेटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. उज्वला थिटे यांच्या अर्जाला सूचकाची सही नसल्याने अर्ज बाद झाला आहे. दरम्यान अनगर नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे हे दोन अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळं नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. पण 21 तारखेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत असल्याने अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे आपला अर्ज माघार घेतात की कायम ठेवतात यावर पुढील चित्र अवलंबून असणार आहे. मात्र सर्वाधिक चर्चा झालेली राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध भाजप ही लढत होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या सगळ्यांनंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि उज्वला थिटे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.
उमेश पाटलांची राजन पाटील यांच्यावर टीका
अनगर नगरपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांनी भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनगरकर पाटलांचा हा पळपुटे पणा पुन्हा सिद्ध झाला आहे. लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन पाठिंबा सिद्ध करण्याची संधी त्यांनी गमावली आहे. उज्वला थिटे यांच्यावर किती मोठा अन्याय झाला आहे. कितीही मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते हे सिद्ध झालं आहे. अर्ज छाननीत बाद करुन तुम्हीच जिंकला असला तरी लोक म्हणतात उज्वला थिटे जिंकल्या आहेत. उज्वला थिटे खऱ्या मर्दानी आहेत तर अनगरकर पाटील हे पळपुटे आहेत, अशी टीका उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर केली.
महत्वाच्या बातम्या:
अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा सिद्ध झाला; उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, उमेश पाटलांची जहरी टीका
आणखी वाचा
Comments are closed.