भाजपचं मॅन टू मॅन मार्किंग, भविष्याच्या काळजीने शिंदे गट प्रचंड अस्वस्थ, नेमकं काय घडलं?
शिवसेना विरुद्ध भाजप: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी भाजपकडून सुरु असलेल्या राजकीय फोडाफोडीवरुन एकनाथ शिंदे यांची शिवसेना प्रचंड नाराज झाली आहे. यावरुन निर्माण झालेला असंतोष मंगळवारी शिगेला पोहोचला. त्यामुळे शिंदे गटाच्या सर्व मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच (Maharashtra Cabinet Meeting) बहिष्कार टाकल्याची चर्चा होती. त्यानंतर शिंदे गटाचे सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटले होते. राज्यात विविध ठिकाणी भाजपकडून शिंदे गटाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये (BJP) प्रवेश दिला जात आहे. या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या नेत्यांविरोधात नवीन नेतृत्व तयार केले जात आहे, असा एकंदर नाराजीचा सूर शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्यांनी लावला होता. यावर देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना, ‘फोडाफोडीची सुरुवात तुम्हीच केली, तेव्हा मला विचारायला आला होतात का?’, असा सवाल विचारला. यापुढे शिवसेना आणि भाजपने एकमेकांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रवेश देऊ नये, असा तह होऊन या वादावर पडदा पडला.
मराठी Shivsena: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेच्या आमदारांना आव्हान देणारे भाजपमध्ये
छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला . शिवसेना एकत्र असताना या जिल्ह्यात 6 आमदार होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उदयसिंग राजपूत वगळता सगळे आमदार शिंदे गटात गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा 6 आमदार निवडून आले . तर भाजपचे 3 आमदार निवडून आले. विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात लढलेल्या तीन जणांना भाजपने आपल्या पक्षात घेतले आहे.
1. शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजपला सोडचिठ्ठी देत सुरेश बनकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवली.
भाजपने काही दिवसांपूर्वी बनकर यांना प्रवेश दिला.
2. वैजापूरचे शिंदे सेनेचे उमेदवार रमेश बोरणारे यांना भाजपामध्ये असलेले पण ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून तिकीट घेणाऱ्या दिनेश परदेशी यांनी आव्हान दिले होते .आता तेही पुन्हा भाजपवासी झाले आणि नगर परिषद निवडणुकीत दिनेश परदेशी यांनी बोरणारे यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.
3. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना विधानसभा निवडणुकीमध्ये आव्हान देणारे राजू शिंदे यांनीही काल भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला.
4. याशिवाय जिल्हा संघटक भरत सिंग राजपूत यांनाही भाजपाने प्रवेश दिला. शिंदेंच्या महिला जिल्हाप्रमुख शिल्पा वाडकर यांनीही आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याही लवकर भाजपामध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
5. मंगळवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपने पक्षात प्रवेश दिला. शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या मुलाने आणि सूनेने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये गेले होते. हा श्रीकांत शिंदे यांना अप्रत्यक्ष शह असल्याचे सांगितले जाते.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.