महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार; सर्वोच्च न्यायालयात आरक्षण


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 वर सर्वोच्च न्यायालय: महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Local Body Election 2025) निवडणुकीवर टांगती तलवार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काही नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आल्याचा दावा करत त्याला सुप्रीम कोर्टात (Supreme Court On Local Body Election 2025) आव्हान देण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टानेही 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत तीव्र नापसंती व्यक्त करत निवडणुकाच रोखण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होतं याची उत्सुकता आहे.

राज्य सरकारने कोर्टाच्या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावत काही ठिकाणी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा करत त्याविरोधात विकास गवळी यांनी याचिका दाखल केलीय. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज दुपारी 12 वाजता ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.

17 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणती काय घडलेलं?

  1. तुषार मेहता (सरकारी वकील)- निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
  2. तुषार मेहता- निवडणूक आयोगाला अधिकचा कालावधी वाढवून मिळणार नाही , असं न्यायालय म्हणलं होतं.
  3. न्यायाधीश सूर्यकांत- आम्ही असं म्हटलं की बांठिया आयोगाची आम्ही नंतर तपासू पण त्यावेळी जी परिस्थिती त्यानुसार निवडणूक होईल.
  4. (बांठिया अयोगापूर्वी जो कायदा अस्तित्वात होता , असा शब्द सर्वोच्च न्यायालयाचा आदेशात आहे )
  5. न्यायमूर्ती सूर्यकांत- 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नका. नाहीतर निवडणुकाच रोखू…
  6. न्यायमूर्ती सूर्यकांत- बांठिया आयोगाची वैधता आपण नंतर तपासू…
  7. न्यायमूर्ती जॉयमला बागची- पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली जाणार नाही, हा घटनापीठाचा आदेश आहे.
  8. तुषार मेहता- आम्हाला अजून थोडा वेळ मिळावा, तोपर्यंत आम्हाला माहिती घेऊ दे…
  9. न्यायमूर्ती सूर्यकांत- आमचा आदेश खूप सरळ साधा होता… तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ केला आहे.
  10. पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले.

246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान- (Nagarpanchayat Nagarparishad Election 2025)

मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. आता अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज छाननी नंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असून 19 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. तर 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:

आणखी वाचा

Comments are closed.