पार्थ पवारांकडून केवळ कागदावरच नाही तर बाऊंसरच्या मदतीने जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न; दमानिया


पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार याचे सुपूत्र पार्थ पवार हे जमीन व्यवहारांमुळे अडचणीत आले आहेत. दरम्यान अजित पवार यांनीही याबाबत भूमिका मांडली. दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा आणि पुण्याच्या पालक मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरून एक पोस्ट लिहून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेज  (Amadea Enterprises) ने केवळ जागा “कागदावर घेतली नाही” तर १ महिन्यानंतर त्याचा “ताबा” देखील मिळवण्यासाठी नुसतेच प्रयत्न नाही, तर सिक्योरिटी गार्ड जे बाउंसर सारखे होते त्यांना पाठवून पोलिसांच्या मदतीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, असंही अंजली दमानिय यांनी म्हटलं आहे.

Anjali Damania: पुण्याच्या पालक मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे

पार्थ पवार यांच्या Amadea Enterprises ने केवळ जागा “कागदावर घेतली नाही” तर १ महिन्यानंतर त्याचा “ताबा” देखील मिळवण्यासाठी नुसतेच प्रयत्न नाही, तर सिक्योरिटी गार्ड जे बाउंसर सारखे होते त्यांना पाठवून पोलिसांच्या मदतीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. ही बाब खूप धक्कादायक आणि गंभीर आहे. ह्या चौकशी पर्यंत आता अजित पवारांनी उप मुख्यमंत्रीपदाचा आणि पुण्याच्या पालक मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे, पोलिसांच्या स्टेशन डायरीची माहिती जोडत आहे

Anjali Damania: पोस्टमध्ये शेअर केलेल्या कागदपत्रामध्ये काय लिहलंय?

१६ जून २०२५ दुपारी ४ वाजून २८ मिनिटांनी उपरोक्त विषयान्वये आम्ही मुंढवा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर असताना मुंढवा पोलीस ठाण्यात हे कळवण्यात आलं की अॅड. तृप्ती ठाकूर यांनी फोन करुन आमच्या सिक्युरीटी लोकांना बॉटेनिकल गार्डनमध्ये येऊ देत नाहीत त्यामुळे पोलिसांची कुमक पाठवा. अधिकाऱ्यांच्या आदेशाने आम्ही उपनिरीक्षक मुंडे यांच्यासह सदर ठिकाणी गेलो. त्यावेळी बॉटेनिकल गार्डनचे प्रमुख बाळासाहेब कदम (वय-५७), महेश पुजारी आणि फिल्ड ऑफिसर सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस यांचे चार गार्ड हजर होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की उमेश मोरे यांनी नियुक्ती केली आहे. पण ती जागा बोटॅनिकल गार्डनच्या ताब्यात असल्याने बाळासाहेब कदम यांनी सांगितलं. त्यामुळे सेफ सिक्युरीटी सर्विसेस कंपनीच्या लोकांना आपण महसुल खात्याकडून अथवा दिवाणी न्यायालयातुन दाद मागुन आपले तक्रारीचे निवारण करावे असे सांगितले आहे. तसेच सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेवा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत बोटॅनिकल गार्डनचे इन्चार्ज बाळासाहेब कदम व विरोधक महेश पद्मश्री पुजारी यांना तोंडी सुचना दिलेल्या आहेत. सदरबाबत वरीष्ठांना देखील माहिती देण्यात आलेली आहे. तरी सदरबाबत स्टेशन डायरी नोंद होणेस विनंती आहे.

आणखी वाचा

Comments are closed.