शहाजीबापूंनी आत्मपरीक्षण करावं, एवढा निधी देऊन सांगोल्याचा विकास का नाही? गोरेंचा हल्लाबोल


शहाजीबापू पाटलांवर जयकुमार गोरे : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एवढा निधी देऊन सांगोल्याचा विकास का नाही? याचे उत्तर बापूंनी द्यावं असा सवाल गोरेंनी केला आहे. कोणाचे तरी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नाही म्हणत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापूंवर निशाणा साधला.

शहाजी बापूंनी आधी आत्मपरीक्षण करणे गरजेचे

गेले पाच वर्ष सांगोल्यासाठी एवढा मोठा निधी मिळूनही विकास कामे का झाली नाहीत याचे उत्तर आधी शहाजी बापूंनी द्यावे. कोणाचे तरी चालवण्यासाठी किंवा राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी ही निवडणूक नसून ही जनतेच्या प्रश्नासाठी ची निवडणूक आहे, अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधला. कालच शहाजी बापू पाटील यांनी पालकमंत्री गोरे यांचे नाव न घेता भाजपवर सडकून टीका केली होती. आज त्याला उत्तर देताना जयकुमार गोरे यांनी पाच वर्षात एवढा निधी मिळूनही विकास कामे का दिसत नाहीत असा सवाल केला. नगरपालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजपमध्ये सर्वच अलबेल नाही हे दाखवून दिले. शहाजी बापू यांनी आधी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आणि मग युतीच्या चर्चा होत नाहीत असा कांगावा सुरू केल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. शहाजी बापूंनी आधी आत्मपरीक्षण करणे गरजेचे असून त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या काळात केलेली काम का दिसत नाहीत? त्याचा दर्जा का नाही यावर चर्चा झाली पाहिजे अशी ही मागणीही गोरे यांनी केली.

सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपने शहाजी बापू यांचे कट्टर विरोधक असलेल्या शेकापला आणि अजित पवारांचे सहकारी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांना सोबत घेऊन बापूंच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार उतरवल्याने शहाजीबापू नाराज आहेत. यावरुनच काल त्यांनी भाजपवर टीका करताना भाजपचे सुरु असलेले राजकारण हे हिडीस किळसवाणे आणि एखाद्या अवलेवर बलात्कार केल्यासारखे असल्याची भाषा वापरली होती. याला आज उत्तर देताना गोरे यांनी शहाजी बापूंवर ही सडकून टीका केली.

महत्वाच्या बातम्या:

Sushma Andhare : जयकुमार गोरे कोण तीस मार खान? गोरेंनी आणि चाकणकरांनी आधी स्वतःच चारित्र्य बघावं; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल, SP तुषार दोशींचेही वाभाडे काढले

आणखी वाचा

Comments are closed.