10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेला अटक
पालघर : वसईत 13 वर्षीय बालिकेच्या मृत्यू प्रकरणी शिक्षिका ममता यादव हिच्यावर वालीव पोलिसांनी (Police) बीएनएस 304 अन्वये गुन्हा दाखल करुन आज अटक केली आहे. शाळेत यायला दहा मिनिटं उशीर झाला म्हणून त्या शिक्षकेने अक्षरशः शंभर उठक बैठक काढायला लावल्याचा आरोप मृत मुलगी कांजल गौडच्या पालकांनी केला होता. उपचारादरम्यान 14 नोव्हेंबर रोजी त्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना संताप व्यक्त केला. याप्रकरणी शाळेनं शिक्षिकेला निलंबीत ही केलं होतं. तर ती शाळा अनधिकृत असल्याचाही उघड झालं होतं. आता, शिक्षिकेविरुद्ध (Teacher) मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई पश्चिमेच्या सातीवली परिसरातील श्री हनुमंत विद्या हायस्कूल या शाळेमध्ये 13 वर्षाची अंशिका उर्फ काजल गौड ही इयत्ता 6 वीत शिकत होती. शनिवारी 8 नोव्हेंबरला काजल नेहमीप्रमाणे शाळेत गेली मात्र शाळेत जायला तिला दहा मिनिटे उशीर झाला. काजल सोबतच्या इतरही मुलांना शिक्षिकांनी वर्गाबाहेर काढलं आणि शंभर उठक बैठक काढायला लावल्या. कुणी दहा काढल्या, कुणी 20 काढल्या मात्र काजलने घाबरून शंभर उठा-बशा काढल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून काजल आजारी पडली आणि तिला सोमवारी रात्री उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. वसई पश्चिमेच्या आस्था हॉस्पिटलमध्ये ती उपचार घेत होती. त्यानंतर गुरुवारी नालासोपाराच्या विजय लक्ष्मी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, तिची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे तिला शुक्रवारी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. मात्र, त्याच रात्री 11 वाजताच्या दरम्यान बाल दिनाच्या दिवशीच तिने आपले प्राण सोडले. त्यामुळे जे.जे.मार्ग पोलीस ठाण्याहून झिरो नंबर हून आकस्मिक मृत्यूची नोंद करुन, ती नोंद वालीव पोलीस ठाण्यात हस्तांतरीत करण्यात आली होती.
दरम्यान, याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल झाली होती. मात्र, पोलिसांनी तपास करत, शिक्षिका ममता यादव विरोधात गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे. या घटनेनं शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.