आपलेच आहेत तर समोर का?, निलेश राणेंचा सवाल; कोकणाच नारायण राणेंची दोन्ही मुलं आमनेसामने, नेमकं
Kankavali Nagarparishad Election 2025: कणकवलीमध्ये नगरपरिषद पंचायत समित्याच्या निवडणुकांमध्ये (Kankavali Nagarparishad Election 2025) राणे विरूद्ध राणे अशी प्रतिष्ठा पणाला लागलीय. नितेश राणे (Nitesh Rane) आणि निलेश राणे (Nilesh Rane) दोघेही आमने सामने आहेत. कणकवलीत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आहे. तर भाजपला रोखण्यासाठी शिंदे सेना, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी अनोखी युती होत शहर विकास आघाडी स्थापन झाली आहे. त्यामुळे भाजपकडून मंत्री नितेश राणे आणि शिवसेनेकडून आमदार निलेश राणे आमनेसामने येत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. मित्रपक्षावर पातळी सोडत टीका करणार नाही, असं नितेश राणेंनी म्हटलंय. तसेच नारायण राणेंनी (Narayan Rane) आपल्याला ज्या पक्षात असतो तिथे 100 टक्के द्यावं असं सांगितलं. त्यामुळे आम्ही दोघे बंधू त्या त्या पक्षाला 100 टक्के देतो. त्यामुळे निलेश राणे आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी कणकवलीत येतील असं नितेश राणेंनी म्हटलं. तर निलेश राणेंनी माजी आमदार राजन तेलींच्या (Rajan Teli) घरी शहर विकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र करत शक्तिप्रदर्शन केलं.
आपण गुलाल उधळायचा, फटाके देखील आपलेच फुटतील- निलेश राणे (Kankavali Nagarparishad Election 2025)
शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी थेट माजी आमदार राजन तेलींच्या घरी शहर विकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र करत शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी जमलेल्या नागरिकांमध्ये उत्साह भरण्यासाठी भावनिक, उत्साहपूर्व मात्र आक्रमक शैलीत भाषण केलं. यावेळी विरोधक अंगावर आले तर शिंगावर घेण्याची भाषा केली. मात्र यावेळी महाभारतातील श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले उपदेश देत सगळेच आपले आहेत समोर, जर आपलेच आहेत तर समोर का? ते आपल्या बरोबर असले पाहिजेत. आपण मात्र विकासात्मक चर्चा केली पाहिजे, बंधू नितेश राणेंना टोला लगावला. शहर विकास आघाडीवर टीका टिप्पणी होईल, आरोप केले जातील. पैशांचा वापर केला जाईल. मात्र आपण गुलाल उधळायचा, फटाके देखील आपलेच फुटतील असा विश्वास निलेश राणेंनी यावेळी व्यक्त केला.
युती तोडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेण्यात आले- निलेश राणे (Nilesh Rane vs Nitesh Rane)
आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यांना आमच्या सोबत युती करायची नव्हती. ज्यांना आमच्या सोबत ज्यांना युती करायची आहे ती युती झाली. त्यामुळे प्रचारासाठी कणकवलीत आलो. शहर विकास आघाडीला निवडून आणण्यासाठी आम्ही सक्रिय झालो आहोत. खासदार नारायण राणे अजूनही युतीसाठी आग्रही होते, मात्र आता युती होईल असं वाटत नाही. त्यामुळे नारायण राणेंनी आम्हाला सांगितलं, तुम्ही शिवसेना म्हणून काम करा. त्यामुळे आम्ही शिवसेना म्हणून आमच्या बाजूने वातावरण आहे, तिथे पाठिंबा देणार. चारी ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकवू. नारायण राणे आणि एकनाथ शिंदे या आमच्या नेत्यांना सांगून शहर विकास आघाडीमध्ये आलेलो आहेत. संदेश पारकर जेव्हा प्रचाराला बोलावतील तेव्हा यावचं लागेल. नात नात असत ते अश्या कुठल्या निवडणुकीतून तुटतं नसत. युती तोडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेण्यात आले, अशी भाजपवर टीका निलेश राणेंनी केली.
कणकवलीत राणे विरुद्ध राणे, VIDEO:
आणखी वाचा
Comments are closed.