मंडलिक म्हणाले, मुश्रीफ-घाटगेंची प्रॉपर्टीची युती; मुश्रीफ म्हणाले तोंड सांभाळून बोला, अन्यथा..


संजय मंडलिक यांच्यावर हसन मुश्रीफ कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कागल नगरपालिकाच्या निवडणुकीच्या (Kagal nagarpalika election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे (Samarjit Ghatge)  यांच्यामध्ये युती झाली आहे. यावरुन माजी खासदार आण शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांनी टीका केलीय. या दोघांची झालेली युती ही  प्रॉपर्टी ची आहे अशी टीका माजी खासदार संजय मंडलिक यांनी केली आहे. या त्यांच्या टीकेला मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी जर तोंड उघडले तर बात दूर दूर तक जायेगी, असा इशारा मुश्रीफांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले हसन मुश्रीफ?

संजय मंडलिक यांनी अजूनही तोंड आवरून सांभाळून बोलावे. मी जर तोंड उघडले तर बात दूर दूर तक जायेगी, असा इशारा मुश्रीफांनी दिला आहे. संजय मंडलिक यांनी बेजबाबदारपणे चुकीचे आरोप करू नयेl असे मुश्रीफ म्हणाले. संजय मंडलिक यांनी लोकनेते स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकसाहेब यांच्याशी आपली तुलना करून घेऊ नये. स्वर्गीय खासदार मंडलिकसाहेब कुठे आणि संजय मंडलिक कुठे? असा टोला देखील हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिकांना लगावलाय.

नेमकं काय म्हणाले होते संजय मंडलिक?

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मध्ये हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्यामध्ये झालेली युती ही प्रॉपर्टीची आहे अशी टीका माजी खासदार संजय मंडलिक यांनी केली आहे. कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण एकत्र आल्याचे हे दोन्ही नेते सांगत असले तरी एका नेत्याची प्रॉपर्टी वाचवायची आहे आणि दुसऱ्याला मधून सुटका करुन घ्यायचे आहे असे संजय मंडलिक म्हणाले. शिवाय आमच्या उमेदवारांना दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडू नये म्हणून सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो एकाकी पडतो त्याच्या पाठीशी जनता उभी राहते, कागलमध्ये देखील माझ्या पाठीशी संपूर्ण जनता उभी राहिली आहे, असं संजय मंडलिक यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.  मुश्रीफआणि समरजित घाटगे यांच्या आघाडीमुळे आता कागलचं राजकारण पूर्णपणे फिरल्याचं दिसून येतंय. कागलमध्ये या दोन्ही गटांची मोठी ताकद आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद हे मुश्रीफ गटाला तर उपनगराध्यक्षपद हे समरजित घाटगे गटाला असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Kagal : कागलचं राजकारण 24 तासात फिरलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; कट्टर विरोधक मुश्रीफ-समरजीत घाटगेंचा तह, शिंदेंची शिवसेना एकाकी

आणखी वाचा

Comments are closed.