वाळू माफियांना दणका! तब्बल सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त, पंढरपूरमध्ये अधिकाऱ्यांची मोठी कारवाई


Pandharpur : प्रशासन निवडणुकीच्या धामधुमीत अडकलेले असताना वाळू माफियांनी भीमा नदी पात्रात जोरदार बेकायदा वाळू उपसा सुरू केला होता. मात्र याची माहिती समजतात पंढरपूरचे डीवायएसपी असणारे आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांनी छापे टाकत तब्बल सव्वा कोटी रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे वाळू माफियांचे कंबरडेच मोडले असून डगळे यांनी पोलीस प्रशासनाला अवैध वाळू उपशावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

पोलिसांच्या पथकासह गुरसाळे व शेळवे येथे छापा टाकत तब्बल सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त

आज पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे आणि शेळवे येथील भीमा नदीपात्रात जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांना मिळाली होती. यानंतर तातडीने डगळे यांनी पोलिसांच्या पथकासह गुरसाळे व शेळवे येथे छापा टाकत तब्बल सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 50 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. गुरसाळेत 58 लाख 80 हजार  तर शेळवेत 67 लाख 8 हजार रुपये असा एकूण 1 कोटी 25 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती प्रशांत डगळे यांनी दिली. या कारवाईमुळे भीमा नदी पात्रात रोज लाखोंचा वाळू उपसा करणाऱ्या माफीयांना आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांनी जोरदार दणका दिला असून अवैध वाळू उपशावर अशाच कठोर कारवाया सुरू राहतील असा इशारा दिला आहे.

अनेक भागात बेकायदा वाळू उपसा रोखण्याची मागणी

एका बाजूला प्रशासन नगरपालिका निवडणुका गुंतलेले असताना याचाच फायदा वाळू माफिया घेत असल्याने भीमा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा सुरू होता. गुरसाळे आणि शेळवे वर कारवाई झाल्यानंतर आता गोपाळपूर, शेगाव दुमाला, शिरढोण, चळे , आंबे अशा विविध गावातही बेकायदा वाळू उपसा रोखण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

दरम्यान, सद्या राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सर्व प्रशासन यंत्रणा या निवडणुकीच्या कामामध्ये गुंतली आहे. याचा फायदा वाळू माफिया घेताना दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू माफियांनी भीमा नदी पात्रात जोरदार बेकायदा वाळू उपसा सुरू केला होता. मात्र, आज मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी थेट नदी पात्रातच जात कारवाई केली आहे. दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Jalna Crime: जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश

आणखी वाचा

Comments are closed.