चारित्र्याचा संशय अन् वारंवार वाद; नवऱ्याने बायकोला मध्यरात्री अडीच वाजता ठेचून संपवलं, सकाळी प


मुंबई: मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीच्या चरित्र्याच्या संशयावरून पतीने दगडाने ठेचून पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मालवणी कच्च्या रोड आडवा पट्टा जवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीची हत्या करून मालवणी पोलिसांकडे सरेंडर केलं. अटक आरोपीचे नाव सिराज नाईक वय 56 वर्ष असून पत्नी मुमताज सोबत मालवणी परिसरात राहत होता. मागील दोन महिन्यापासून पत्नी मुमताजच्या चरित्र्यावर त्याला संशय होता, याच्याच राग धरून काल (गुरूवारी, ता २०) सकाळी आरोपी पतीने दगडाने ठेचून पत्नीची हत्या केली. सध्या मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पती सिराज नाईक याला अटक केली आहे. हत्या मागे अजून काही कारण आहे का या संदर्भात अटक आरोपीकडून मालवणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Mumbai Crime News:  तिचे इतर पुरुषांसोबत संबंध असल्याचा आरोप करुन शिवीगाळ

तर मिळालेल्या माहितीनुसार  मालाडच्या मालवणी परिसरात राहणार्‍या एका 52 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने दगडीने ठेचून निर्घृणपणे हत्या केली. मुमताज सिराज नाईक असे मृत महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी आरोपी पती सिराज अहमद आदम नाईक (57) याला मालवणी पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. सकाळी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. ही घटना बुधवारी रात्री उशिरा अडीचच्या सुमारास मालाडच्या मालवणी परिसरात घडली. याच परिसरात नाईक कुटुंबिय राहतात. सिराज हा त्याची पत्नी मुमताजच्या चारित्र्यावरुन संशय घेत होते. तिचे इतर पुरुषांसोबत संबंध असल्याचा आरोप करुन तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. या कारणावरुन त्यांच्यात नेहमीच वाद होत होते.

Mumbai Crime News: रागाच्या भरात त्याने मुमताजची दगडाने ठेचून हत्या

बुधवारी रात्री उशिरा त्यांच्यात याच कारणावरुन वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात त्याने मुमताजची दगडाने ठेचून हत्या केली होती. हत्येनंतर सकाळी तो मालवणी पोलीस ठाण्यात आला आणि त्याने तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्याने त्याच्या पत्नीची हत्या केल्याचे सांगताच पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले होते. यावेळी मुमताजला पोलिसांनी शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी सिराज नाईक याच्याविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. पोलिस घटनेचा सखोल तपास करत आहेत.

Mumbai Crime News: पत्नीच्या हत्येनंतर पतीने पोलिसांसमोर पत्करली शरणागती

मालवणी परिसरात एका 52 वर्षीय व्यक्तीने पत्नीचा खून करून थेट पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केलं आहे. पोलिसांनी आरोपी सिराज नाईक याला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सिराज नाईकने त्याची पत्नी मुमताज नाईक (वय 45) हिची हत्या ती झोपेत असताना केली. ही घटना SRA प्रकल्पांतर्गत मिळणाऱ्या फ्लॅटसाठी झालेल्या वादातून घडल्याचे समोर आले आहे. नाईक आपल्या पत्नी आणि तीन मुलांसोबत मालवणी परिसरात राहत होता. त्याचे घर SRA प्रकल्पाचा भाग होते. फ्लॅट मिळवण्यासाठी बिल्डरला 9.70 लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने पत्नीला सांगितले होते. मात्र मुमताजने यास विरोध केला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादानंतर मुमताज झोपायला गेली. त्यानंतर आरोपीने एक जड दगड आणून तिच्या डोक्यात वार केला. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर सिराज नाईक थेट मालवणी पोलीस स्टेशनमध्ये आला आणि गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा

Comments are closed.