वडिलांचा विरोधातील उमेदवाराला पाठिंबा जिव्हारी लागला; सलील देशमुखांच्या राजीनाम्याचं सत्य समोर
नागपूर : वडील अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरचा नाराजीतून सलील देखमुख (Salil Deshmukh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा (Salil Deshmukh Resignation) दिल्याची माहिती समोर आली आहे. काटोल नगर परिषद निवडणुकीत (Nagarpanchayat Election) राहुल देशमुख यांच्या शेकापसोबत आघाडी करू नये, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कोणताही उमेदवार द्यावा, मात्र राहुल देशमुखसोबत आघाडी नको, अशी सलील देशमुख यांची इच्छा होती. मात्र अनिल देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या मतांना प्राधान्य देत राहुल देशमुख यांच्यासोबत आघाडी केली आणि राहुल देशमुख यांना आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केला. हीच बाब सलील देखमुख यांच्या जिव्हारी लागली असून ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Salil Deshmukh Resignation : वडील आपल्या मताला प्राधान्य देत नाहीत्यामुळे,ऐन निवडणुकांच्या रणधुमाळी राजीनामा
राहुल देशमुख यांनी सलील देशमुख यांच्या विरोधात नुकतीच विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे हि गोष्ट सालील देशमुख यांना खुपली. वडील आपल्या मताला प्राधान्य देत नाही, या रागातून सलील देशमुख यांनी गुरुवारी पक्ष सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. यासंदर्भात अनिल देशमुख यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी मात्र यावर अधिक बोलायला नकार दिला.
नुकतेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी शरद पवार गटाचा पक्षाचा सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या घटनेने कायदा निवडणुकांची रणधुमाळी नागपुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना आपला राजीनामा पाठवला आहे.
Salil Deshmukh : वडिलांचा विरोधातील उमेदवाराला पाठिंबा लेकाच्या जिव्हारी लागला
एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू असताना सलील देशमुख यांनी अचानकपणे प्रकृतीचे कारण दिलं. डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मी आराम करत आहे. त्यासाठी राजीनामा दिल्याचे सलील कुलकर्णी यांनी त्यावेळी सांगितलं. फक्त विधानसभा निवडणूकीत विरोधात लढलेल्या शेकापच्या राहुल देशमुख यांच्यासोबत आघाडी केली आणि काटोल नगर परिषद निवडणुकीत राहुल देशमुख यांना आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केला. या गोष्टीला सलील देशमुख यांचा टोकाचा विरोध होता. मात्र वडिलांनी कार्यकर्त्यांच्या मतांना प्राधान्य देत विरोधातील उमेदवाराला पाठिंबा दिल्याने हीच बाब लेक सलील देशमुखांच्या जिव्हारी लागला असल्याचे बोललं जात आहे.
आणखी वाचा
Comments are closed.