राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याबाबत शरद पवार सकारात्मक; काँग्रेसला स्पष्ट सांगितले, म्हणाले
शरद पवार राज ठाकरे मनसे बीएमसी निवडणूक 2025 वर मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती (Shivsena Thackeray Group MNS Alliance) जवळपास निश्चित मानली जात आहे. तर मनसेशी वैचारिक मतभेद असल्यानं मुंबई काँग्रेस यांनी ठाकरे बंधू सोबत न जाता स्वबळावर मुंबईत निवडणूक लढवण्याचा निर्णय एक प्रकारे घेतल्याचा पहायला मिळत आहे. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मिळून निवडणुकीच्या रिंगणात एकत्रित उतरला पाहिजे आणि त्यामध्ये राज ठाकरे (Uddhav Thackeray-Raj Thackeray) हे सुद्धा सोबत असावे यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.
महायुतीविरोधात मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election 2025) जिंकायची असेल तर विरोधकांची वज्रमूठ आणखी घट्ट करून ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे हे प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे. तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकत्र लढवली पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांचं असल्याचं सांगण्यात येत आहे.
शरद पवारांचं मत काय? (Sharad Pawar On Mns)
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी महाविकास आघाडीबाबत चर्चा झाली. मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आणि मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता?, असं शरद पवार यांचं मत आहे. महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याच्या संदर्भात शरद पवार सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे काही दिवसांआधी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केलेली काँग्रेस आपला निर्णय मागे घेणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वर्षा गायकवाड मनसेला सोबत घेण्याबाबत काय म्हणाल्या होत्या? (Varsha Gaikwad BMC Election 2025)
मागच्या काही काळात दोन महिन्यांपूर्वी आम्ही महाविकास आघाडी म्हणून नाही तर स्वबळावर निवडणुका लढवणार आहोत, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होतं. ही निवडणूक स्थानिक पातळीवरची असल्याने आम्ही एकट्याने लढू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. बाकी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर आम्ही शुभेच्छाच देतो. पण हा निर्णय घेताना आमच्याशी चर्चा व्हायला हवी होती. काँग्रेस पक्ष हा आघाडी करताना एक किमान समान कार्यक्रम समोर ठेवून आघाडी करतो. इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो, आमच्यासाठी संविधान हा समान धागा राहिलेला आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.