MVA Politics Mumbai : मुंबई मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसची उद्धव ठाकरेंना ऑफर

मुंबई : उद्धव ठाकरेंनी (उद्धव ठाकरे) मनसेची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावं अशी ऑफर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा विश्वासात न घेता मनसेसोबत वेगळी चूल मांडल्यानंतर काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी दिसते. त्यामुळेच काँग्रेसने 'चला एकटे जाऊ'चा नाराही दिला होता. त्यामुळे एकीकडे मनसेसोबत युतीची चर्चा करत असलेली उद्धव ठाकरेंची शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसने या आधीच स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. मात्र मनसेची साथ सोडून जर उद्धव ठाकरे सोबत आले तर काँग्रेस स्वबळाचा पुनर्विचार करेल, मात्र त्यासाठी काही अटी आणि शर्ती लागू असतील अशी सूत्रांची माहिती आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी काँग्रेस उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहे. मात्र मनसेच्या समावेशावरुन माघार न घेण्यावर काँग्रेस ठाम असल्याची माहिती आहे.

Comments are closed.