अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने पाकिस्तानची लॉटरी! सरळ फायनलमध्ये मारली धडक, टीम इंडिया बाहेर


आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने श्रीलंकेवर मात केली. पाकिस्तानने आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 मध्ये आपला दणका कायम ठेवत धमाकेदार प्रदर्शन केलं. लीग स्टेजमधील तिन्ही सामने जिंकल्यानंतर आता पाकिस्तानने सेमीफायनलमध्येही श्रीलंका संघाचा 5 धावांनी पराभव केला. यामुळे आता फायनलमध्ये त्याची लढत बांगलादेश संघाशी होणार आहे, ज्याने पहिले सेमीफायनल सुपर ओव्हरमध्ये जिंकत टीम इंडियाला स्पर्धेबाहेर केले.

अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने पाकिस्तानची लॉटरी!

एकेकाळी श्रीलंकेचा स्कोअर 8 बाद 99 असा होता आणि पाकिस्तान विजयाच्या उंबरठ्यावर दिसत होता. पण मिलान रत्नायकाने 32 चेंडूत 40 धावा केल्या आणि ट्रेविन मॅथ्यूसोबत नवव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. उबैद शाहच्या शेवटच्या षटकात मैदानावरील पंचांनी त्याला चुकीच्या पद्धतीने एलबीडब्ल्यू दिला. चेंडू स्पष्टपणे लेग स्टंपच्या बाहेर होता. पण, या स्पर्धेत डीआरएस नसल्याने तो पॅव्हेलियनमध्ये परतला आणि श्रीलंका अ संघ 5 धावांनी सामना गमावला.

श्रीलंका अ संघाने शानदार गोलंदाजी करत पाकिस्तान अ संघाला 153 धावांवर रोखले. प्रमोद मदुशनने चार आणि ट्रेविन मॅथ्यूजने तीन बळी घेतले. 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाने दमदार सुरुवात केली. लसिथ क्रसपुले सात चेंडूत 27 धावा काढून बाद झाला. हलमबागेनेही जलद 29 धावा केल्या. एका वेळी धावसंख्या दोन बाद 74 होती, धावगती 10 च्या आसपास होती. तिथून श्रीलंका मजबूत स्थितीत होता, परंतु गोलंदाजांनी अखेर पाकिस्तानला परत आणले.

श्रीलंकेच्या विकेट पडू लागल्या. सुफियान मुकीमने त्याच्या पहिल्या षटकात दोन विकेट घेतल्या. त्यानंतर अहमद दानियलने पुढच्या षटकात कर्णधार वेलालागेला बाद केले. त्यानंतर मुकीमने दुसऱ्या षटकात आणखी एक विकेट घेतली, रमेश मेंडिसला क्लिन बॉलिंग दिली. त्यानंतर साद मसूद आला आणि त्याने अराचिगे आणि मदुशनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 74 धावांवर दोन विकेट गमावल्यानंतर, 99 धावांवर 8 विकेट पडल्या. श्रीलंकेने फक्त 25 धावांत 6 विकेट गमावल्या.

एक निर्णय श्रीलंकेसाठी घातक ठरला

यानंतर मिलान रत्नायकाने आपली हुशारी दाखवली आणि एकटा शेवटपर्यंत खेळला. पण नशीब त्याच्यासोबत नव्हते आणि एक निर्णय श्रीलंकेसाठी घातक ठरला. श्रीलंका अ संघाला 4 चेंडूत 8 धावांची आवश्यकता होती पण तो चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. पाकिस्तानच्या 153 धावांच्या प्रत्युत्तर संपूर्ण श्रीलंका अ संघ 148 धावांवर बाद झाला.

आता फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश भिडणार

बांगलादेशने इंडियाला पराभूत करत दमदार फॉर्म दाखवला आहे. तर पाकिस्तान संपूर्ण स्पर्धेत अजूनही अपराजित आहेत. त्यामुळे 23 नोव्हेंबरला दोहा येथे रात्री 8 वाजता होणारा फायनल सामना चुरशीचा, तुफानी आणि भरपूर थरारक असणार यात शंका नाही. पाकिस्तानकडे सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा विक्रम आहे आणि आता ही आघाडी आणखी वाढवण्याची सुवर्णसंधी त्यांच्यासमोर आहे.

हे ही वाचा –

South Africa Squad for India ODI-T20 : भारताविरुद्धच्या ODI आणि टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा! निवृत्तीनंतर घेतल्या स्टार खेळाडूची पुन्हा एन्ट्री, संपूर्ण टीम

आणखी वाचा

Comments are closed.