अकलूजकरांनी सर्व संस्था मोडून खाल्ल्या, ज्या आहेत त्या केवळ देवाभाऊंमुळेच : जयकुमार गोरे
जयकुमार गोरे, अकलूज : अकलूजमध्ये सर्वf आणि लुटून ठेवलेलंहेकाही शिल्लक राहिलंच नाही. ना चौकातली जागा, ना बाजूची जागा, ना खिशातले पैसे., ना बँकेतले पैसे, ना बँकेत पैसे असे टोले लगावत ना कारखान्यात काही ठेवले, ना कुक्कुटपालन संस्थेत ठेवलं, ना सुमित्रा पतसंस्थेत ठेवलं. विजय पतसंस्था कुठे गेली कळलंच नाही. ना रत्नप्रभामध्ये ठेवले. शंकराव मोहिते पाटील बँकेचे काय झाले, सांगता येत नाही. सूतगिरणी कुठे गेली याचा तपास नाही. शिवकृपा कुक्कुटपालन कुठे गेले ते कळेना. एवढे कोंबडे खातात का? अशी मोठी यादी वाचत सोलापुरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी बंद पडलेल्या संस्थांचा पाढाच वाचला. पैसे खाल्ले, जमीन खाल्लीकोंबडी खाल्लं सगळं खाल्लं. आता नागरिकांनीच आपला राग बटन दाबून दाखवून द्या, असे आवाहनही गोरे यांनी अकलूजकरांनाही केले.
अकलूजमध्ये प्रचाराचा नारळ फोडतानाच गोरे यांनी अकलूज मध्ये सुरू असलेल्या दहशतीवर प्रहार करत आता ही दहशत मोडून काढायची वेळ आल्याचे सांगितले. मोहिते पाटील यांचे नाव न घेता बंगल्यावर फक्त खंडणीखोर गुंड वाळू चोर यांचीच गर्दी असते सामान्य लोकांना येथे स्थान नाही असे सांगितले. एक वेळ अकलूजचा आदर्श राज्यभर घेतला जायचा पण या पिढीने सगळ्यांची वाट लावली असे टोलेही लगावले.
Jaykumar Gore : चालू संस्था केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच
अकलूज परिसरातल्या आज सर्व संस्था बंद पडल्या आहेत. ज्या चालू आहेत त्या केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सुरू आहेत. आज यांचे दोन्ही कारखाने केवळ देवा भाऊंच्या मदतीमुळे सुरू आहेत, असे सांगत भाजपने केलेल्या उपकाराची जाणीवहे त्यांनी करून दिली. ज्यांनी सर्व देत मदत केली हे ना त्या पक्षासोबत विश्वासू राहिले, ना जनतेसोबत ना नेतृत्वासोबत, असे सांगत सडकून टीका केली. अकलूजची दहशत संपवणार. माझ्याकडे साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो. असे म्हणत जयकुमार गोरे यांनी अकलूजमध्ये मोहिते पाटलांना थेट आव्हान दिलंय.
…..तर माझ्याकडे साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो
अकलूजची दहशत खंडणीखोरी संपवण्यासाठी परिवर्तन घडवा. तुम्हाला पोलिसात जायचे अडचण वाटत असेल तर माझ्याकडे साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो. आम्ही चुकीचे नाही वागणार, पण कोणाला चुकीचे वागूहे देणार नाही. आम्ही कोणाला दादागिरी खंडणीखोरी करू देणार नाही, असा इशारा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अकलूज येथील प्रचार शुभारंभ सभेत केला. यावेळी मोहिते पाटलांचे विरोधक सर्व भाजप शिवसेनेच्या स्टेजवर एकत्र आले होते.
दहशत संपवण्यासाठी आणि अकलूजच्या विकासासाठी भाकरी फिरवा
भाजपने दिलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा कोथिमीरे या उच्चशिक्षित असून दुसऱ्या बाजूला खंडणीचे गुन्हे दाखल झालेली कुटुंब विरोधात लढत आहे अशी तुलना करत भाजप सेना युतीचे सर्व उमेदवार हे उच्चशिक्षित आणि प्रामाणिक असल्याने अकलूजची दहशत संपवण्यासाठी आणि अकलूजच्या विकासासाठी येथील भाकरी फिरवा असे आवाहन जयकुमार गोरे यांनी केले. अकलूज येथील विजय चौकात झालेल्या या सभेला खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली होती. याचाच धागा पकडत शहरातील डॉक्टर व्यापारी आणि सर्वसामान्यांना यापुढे कोणत्याही गुंडगिरी अथवा दहशतीला घेण्याची गरज नसल्याचेही गोरे यांनी सांगितले. युतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राज्याचे सरकार आणि देवा भाऊ पूर्ण ताकतीने असल्याने नागरिकांनी दहशतीला झुगारून अकलूजच्या विकासासाठी भाजपला विजयी करण्याचे आवाहन गोरे यांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.