आत्याच्या घरी लग्नाची घाई; कुटुंबीय तयारीत मग्न, 13 वर्षीय अल्पवयीन मुलीनं घरात जाऊन गळ्याला दो


नागपूर: मोबाईलसाठी रागावल्याने तेरा वर्षीय मुलीने आत्महत्या (Nagpur Crime News) केल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. मोबाईल दिला नाही म्हणून नागपूर जिल्ह्यातील चणकापूर येथील जय भोले नगर परिसरात तेरा वर्षीय दिव्या सुरेश कोठारे या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (Nagpur Crime News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दिव्याने मोबाईल मागितला. इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप सारखी सोशल मीडिया ॲप ती नियमित वापरत होती. मोबाईलचा अतिवापर तिच्याकडून होत असल्याने अभ्यासाकडे तिचे दुर्लक्ष होत असल्याने “मोबाईल कमी वापर, अभ्यासाला प्राधान्य दे” असा तगादा दिव्याकडे लावत होते.(Nagpur Crime News)

शुक्रवारी घटनेच्या दिवशी आत्याच्या घरी लग्न सर्व कुटुंबीय तिकडेच होते. सायंकाळी नेहमीप्रमाणे दिव्याने मोबाईल मागितला, मात्र घरच्यांनी नकार दिला. मोबाईल न दिल्याने दिव्या नाराज झाली. रागाच्या भरात ती आत्याच्या घरातून निघून सरळ स्वतःच्या घरी आली. तेव्हा घरी कुणीच नव्हते. घरात बांधलेल्या पाळण्याच्या दोरीला तिने गळफास घेतला. काही वेळाने तिची मोठी बहीण तिला शोधत घरी आली असता हा प्रकार उघडकीस आला. तिने आत्याकडे धावत जाऊन आई-वडिलांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला पुढील तापस सुरू आहे. मात्र या घटने सर्व पालकांना हादरून सोडले.(Nagpur Crime News)

Nagpur Crime News: नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल दिला नाही म्हणून राग आठवीत आल्याने शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत दिव्या कोठारे दिव्या सुरेश कोठारे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. चणकापूर येथील जय भोले नगर परिसरात शुक्रवारी (दि.२१) संध्याकाळी ही घटना घडली. दिव्या कोठारे ही चणकापूर येथील वॉर्ड क्रमांक १ मधील महात्मा फुले शाळेत आठवीत शिकत होती. तिचे कुटुंब वॉर्ड क्रमांक ६, हनुमान नगर येथे राहते. उद्या २४ नोव्हेंबर रोजी तिच्या आत्याच्या मुलीचे लग्न असल्याने शुक्रवारी दिव्या आणि तिचे आई-वडील तसेच कुटुंबीय आत्याकडे कार्यक्रमासाठी गेले होते. दिव्याची आत्या ही घरापासून काही अंतरावरच राहते. दिव्याने संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोबाईल मागितला. मोबाईल न दिल्याने दिव्या नाराज झाली. रागाच्या भरात ती आत्याच्या घरातून निघून सरळ घरी आली. तेव्हा घरी कुणीच नव्हते. घरात बांधलेल्या पाळण्याच्या दोरीला तिने गळफास घेतला.

आणखी वाचा

Comments are closed.