तेनू लेके मैं जावांगा… गळ्यात हार टाकला अन्… स्मृती मानधनाच्या लग्नातील रोमँटिक डान्सचा व्ह


स्मृती मानधना आणि पलाश मुच्छाल वेडिंग डान्स: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिचा आज विवाह सोहळा गायक पलाश मुच्छलशी होणार आहे. सांगली येथील स्मृतीच्या फार्म हाऊसवर अगदी मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू गेल्या दोन दिवसांपासूनच सांगलीमध्ये दाखल झाल्या आहेत. आज लग्नाचा मुख्य सोहळा दुपारी चार वाजता सुरू होईल. या विवाह सोहळ्याला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहतील अशी माहिती पोलिसांच्या कडून देण्यात आली आहे. तर आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्या उपस्थितीबद्दल मात्र शंका उपस्थित केली जातेय. ज्या ठिकाणी स्मृती मानधनाचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

स्मृती–पलाशचा रोमँटिक डान्स व्हायरल

दरम्यान, स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा एक रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही सलमान खानच्या ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणं तेनू लेके मैं जावांगा… या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. स्टेजवर दोघांची केमिस्ट्रीमुळे तिथलं वातावरणच रंगून गेलं.

2019 पासून प्रेम, आता विवाहबद्ध

स्मृती आणि पलाश 2019 पासून एकमेकांना डेट करत होते. सुरुवातीला दोघांनीही आपले रिलेशनशिप खाजगी ठेवले होते. 2024 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती समोर आली. याच वर्षी पलाशने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून स्मृतीला प्रपोज केलं होतं, आणि तो रोमँटिक क्षणही व्हायरल झाला होता.

स्मृतीने नुकताच रचला इतिहास

अलीकडेच भारत आणि श्रीलंका येथे महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025चे आयोजन झाले. भारतीय महिला संघाने हा वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला, पहिल्यांदाच भारताने महिला विश्वचषक जिंकला. फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि या यशात स्मृती मंधानाचा मोठा वाटा होता. स्मृती मंधानाने आतापर्यंत भारतासाठी 7 टेस्ट, 117 वनडे, 153 टी20 असे सामने खेळले असून त्यांच्या नावावर टेस्टमध्ये 629 धावा, वनडेमध्ये 5322 धावा, टी20मध्ये 3982 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा –

Ind vs Sa 2nd Test : घर पे खेल रहे हो क्या…; अंपायरची वॉर्निंग, कर्णधार ऋषभ पंतचा पारा चढला, कुलदीप यादवला नको नको ते बोलला, नेमकं काय घडलं? पाहा Video

आणखी वाचा

Comments are closed.