गौरी गर्जेचा संशयास्पद मृत्यू, पंकजा मुंडेंच्या पीएवर गुन्हा दाखल, देवेंद्र फडणवीसांची पहिली प
अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांच्या आत्महत्येची बातमी: भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचे 10 महिन्यांपूर्वी लग्न झाले. मात्र, अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे व्हायची. याच मानसिक तणावातून केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे (Gauri Palve Garje) यांनी आत्महत्या केल्याचे समजते. गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी संध्याकाळी आत्महत्या (Suicide news) केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे गौरी पालवे गर्जे यांचे कुटुंबीय आक्रमक झाले होते. अखेर रविवारी वरळी पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai news) तर गौरी पालवे यांच्या मामांनी गर्जेंवर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, सीबीआयची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
Pankaja Munde PA Case: देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणालेत?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केली आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी तुमच्याकडे सीबीआयची मागणी केली या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, अजून माझ्याकडे यासंदर्भातील पूर्ण ब्रिफिंग आलेलं नाही. मला प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रिफिंग केल्यावरच याबाबत बोलता येई, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
Pankaja Munde PA Case: या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत व्हावी
गौरी पालवेंचे मामा हृषिकेश गर्जे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. एका कुटुंबाने मिळवून आमच्या गौरीची केलेली हत्या आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय द्यावा. गौरी ही आत्महत्या करणारी नव्हती, ती संघर्ष करणारी कन्या होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी विनंती करतो की, या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत व्हावी आणि इन कॅमेरा पोस्टमार्टम करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
Pankaja Munde PA Case: अनंत गर्जेने मुलीच्या वडिलांना फोन केला अन्…
गौरी पालवे यांचे मामा शिवदास गर्जे म्हणाले की, पंकजाताई यांना हा माणूस माहीत नव्हता की, हा किती नालायकपणा करत आहे. ताईंचा यात काहीही विषय नाही. पण, अनंत गर्जेने मुलीच्या वडिलांना फोन केला अन् लगेच कट केला. त्यानंतर तिच्या आईला फोन करून सांगितले की, तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. तिची डेड बॉडी माझ्यासमोर आहे. दोन-तीन महिन्यांपासून गौरीचे आणि त्याचे वाद सुरू होते. गौरीला त्याचे अफेअरचे काही प्रकरणादेखील माहिती झाले होते. तरीही तिने त्याला माफ केले होते. पण, तिने त्याला पुन्हा चॅटिंग करताना पाहिले. त्यामुळे त्यांचे वाद होत होते. तो तिला खूप टॉर्चर करत होता, असा आरोप त्यांनी केलाय.
Pankaja Munde PA Case: त्या असल्या नालायक लोकांना…
शिवदास गर्जे पुढे म्हणाले की, त्याने स्वतःच्या हातावर वार करून घेतले होते. तो तिला म्हणायचा की, मी स्वतः मरेल आणि तुला यात गुंतवेन. ती डॉक्टर मुलगी होती. ती लढाऊ मुलगी होती. ती कधीच आत्महत्या करू शकत नाही. पंकजा ताईंना याबाबत काही माहीत नाहीत. त्यांचा काहीही दोष नाही. ताई याला हाकलून देणार, असले नालायक लोक ताई सांभाळत नाही, असे देखील त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
Comments are closed.