स्मृतीच्या वडिलांना सौम्य अटॅक, बीपी वाढला पण सध्या प्रकृती स्थिर; डॉक्टर नेमकं काय म्हणाले?
स्मृती मानधना वडिलांचे आरोग्य : भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना (श्रीनिवास मानधना) यांचा बीपी वाढला होता आणि सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचं दिसून आलं. त्यामुळे स्मृती आणि पलाश मुच्छलचे आज होणारे लग्नही पुढे ढकलण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांवर सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून एक ते दोन दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचा रविवारी सांगलीत शाही विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र विवाहाआधी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली. शारीरिक तणावामुळे त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
श्रीनिवास मानधना हेल्थ अपडेट : अँजिओग्राफी करावी लागण्याची शक्यता
स्मृतीच्या वडिलांना उपचारासाठी सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपचार सुरू असताना त्यांचा बीपीही वाढला होता. त्यामुळे श्रीनिवास मानधना यांच्यावर आता अंजिओग्राफी करावी लागू शकते असं डॉ. नमन शाह यांनी सांगितलं. श्रीनिवास मानधना यांना या आधी कोणतेही आजार नव्हते.
स्मृती मानधना पलाश मुच्छाल लग्न पुढे ढकलले : स्मृतीचे लग्न पुढे ढकललं
रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्रीनिवास मानधना यांच्या छातीत कळ आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता होणारे लग्न पुढे ढकलण्यात आल्याची माहिती स्मृतीच्या कुटुंबीयांनी दिली. लग्नाची पुढची नेमकी तारीख मात्र अद्याप स्पष्ट नाही. श्रीनिवास मानधना यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांकडून त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.
स्मृती आणि पलाश 2019 पासून एकमेकांना डेट करत होते. सुरुवातीला दोघांनीही आपले रिलेशनशिप खाजगी ठेवले होते. 2024 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती समोर आली. याच वर्षी पलाशने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून स्मृतीला प्रपोज केलं होतं, आणि तो रोमँटिक क्षणही व्हायरल झाला होता.
या दोघांचा आणखी एक रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दोघेही सलमान खानच्या सलाम-ए-इश्क चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘तेनू लेके मैं जावांगा…’ या गाण्यावर डान्स करताना दिसत होते.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.