वडिलांना लग्नमंडपातच हार्टअटॅक, उपचार सुरु असताना स्मृती मानधनाचा मोठा निर्णय, इन्स्टाग्रामवरुन


स्मृती मानधना यांनी लग्न पुढे ढकलले भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि चाहत्यांची लाडकी सलामीवीर स्मृती मानधना हिचा 23 नोव्हेंबर रोजी सांगली येथे पलाश मुच्छलसोबत विवाहसोहळा होणार होता. घर सजलं होतं, दारात मंडप पडला होता, पाहुणे येऊ लागले होते… पण रविवारी सकाळी नाश्त्याच्या वेळी अचानक तिचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडली.

पहिल्यांदा हा छोटासा त्रास असेल असे वाटत होते. पण काही मिनिटांत परिस्थिती गंभीर बनली आणि त्यांना तातडीने सांगलीतील रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. या परिस्थितीत स्मृतीने स्वतः पुढाकार घेऊन लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

स्मृतीने सोशल मीडियावरून हटवले लग्न-संबंधित पोस्ट

स्मृतीच्या मॅनेजर तुहिन मिश्रा यांच्या माहितीनुसार, वडिलांची तब्येत पूर्णपणे ठणठणीत होईपर्यंत लग्नाचा कार्यक्रम होणार नाही. या भावनिक स्मृतीने इंस्टाग्रामवरून तिच्या लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकले आहेत. हा निर्णय पाहून तिचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

खास व्हिडिओद्वारे केली होती लग्नाची घोषणा

स्मृतीने ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटातील समझो हो ही गया या गाण्यावर आधारित एक मजेशीर रील पोस्ट करत लग्नाची माहिती दिली होती. या व्हिडिओमध्ये जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डीही तिच्यासोबत दिसत होती. मात्र आता हा व्हिडिओ तिच्या अकाउंटवर दिसत नाही, तिने डिलीट केला की हाइड, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पलाश मुच्छलचा रोमँटिक प्रपोज

दुसरीकडे, पलाश मुच्छल यांनी स्मृतीला नवी मुंबईतील DY पाटिल स्टेडियममध्ये खास पद्धतीने प्रपोज केले होते. त्यांनी 21 नोव्हेंबरला या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, जो अजूनही त्यांच्या अकाउंटवर दिसत आहे.


हे ही वाचा –

Smriti Mandhana: पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?

आणखी वाचा

Comments are closed.