धाराशिवच्या कळंबमध्ये भाजप अन् काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा; पैसे वाटल्याचा आरोप


धाराशिव बातम्या: धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये जोरदार राडा झाला असून दोन गटात जबर हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. प्रभाग सहा मधील भाजप उमेदवार सारिका वाघ यांचे पती रमेश वाघ यांना पैसे वाटताना काँग्रेस उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर गोंधळ झाला असून त्यात भाजप उमेदवारला काँगेस उमेदवारच्या मुलाने जबर मारहाण केल्याचा आरोप रमेश वाघ यांनी केलाहे.

Dharashiv News : भाजप उमेदवाराच्या पतीला काँग्रेस कार्यकर्त्याकडून मारहाण, आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी

तर पेशाने डॉक्टर असलेल्या भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटपाला विरोध केल्याने 10 ते 15 भाजपच्याही कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण करून पाय मोडल्याचा आरोप काँगेसचे उमेदवार पांडुरंग कुंभार यांचे पुत्र मारहाणीत गंभीर जखमी झालेले राहूल कुंभार याने केला आहे. दरम्यान या गोंधळानंतर कळंब पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर गर्दी जमल्याचे बघायला मिळाले. यावेळी एकमेका विरोधात तक्रारी देण्यासाठी दोन्हीही गट आमने-सामने आले. या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फक्त एकंदरीत या प्रकरणामुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापलंहे.

महाराष्ट्र राजकारण: भाजप शिवसेनेत धाराशिवमध्येही तणाव, भाजप विरोधात शिवसेना आक्रमक

भाजप शिवसेनेत धाराशिवमध्येही तणाव पाहायला मिळत आहेत. युती फीस्कटल्यानंतर आता शिवसेना आक्रमक पवित्र्यात आली आहे. आम्हाला अंधारात ठेवायचं आणि यूती तोडायची हे भाजपचे प्लॅनिंग होतं. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना आपण काहीही करू शकतो. आपलीच ताकद जास्त असल्याचं वाटतं. मात्र ही निवडणूक कोणाची ताकद किती आहे दाखवण्याचे आहे. शिवसेना ताकद दाखवणार असा आव्हान जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिले. निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांची शिवसेनेची बैठक घेत त्यांनी निवडणूक रणनीती आखली. लाडक्या बहिणी योजनेचे जनक एकनाथ शिंदे आहेत. त्यामूळे लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहेत एकनाथ शिंदे यांचा मोठा चेहरा आमच्याकडे त्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष पदाला कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय वरिष्ठ घेणार असल्यास ते म्हणाले.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.