दुपारी डान्स प्रॅक्टिस केली अन् काही तासात अनंत गर्जेच्या पत्नीने आयुष्य संपवलं; गौरी गर्जेंसोब
अनंत गर्जे आणि गौरी गर्जे गुन्हा: राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे (Gauri Garje) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वरळी येथे 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचे असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, गौरीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केलाय. या प्रकरणात अनंत गर्जेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला रविवारी रात्री अटक केली आहे. आता गौरी गर्जेंसोबत आत्महत्या करण्याआधी नेमकं काय घडलं? याबाबत माहिती समोर आली आहे.
Anant Garje & Gauri Garje Crime: दुपारी डान्स प्रॅक्टिस केली
केईएम रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, डॉ. गौरी गर्जे या केईएम पालिका रुग्णालयातील दंत विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. सर्वांशी सौहार्दाने वागणाऱ्या गौरी रुग्णांना उत्कृष्ट सेवा देणाऱ्या दंतचिकित्सक म्हणून ओळखल्या जात. शनिवारी त्या नेहमीप्रमाणे कामावर उपस्थित झाल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्यांनी एका सहकाऱ्याच्या लग्नातील विशेष कार्यक्रमासाठी थोडा वेळ नृत्याचा सरावही केला आणि त्यानंतर त्या घरी परतल्या होत्या.
Anant Garje & Gauri Garje Crime: आत्महत्येच्या काही मिनिटापूर्वीच नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण
आत्महत्येच्या काही मिनिटापूर्वीच गौरी आणि अनंत यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडले होते. अनंत गर्जे यांची गाडी कोस्टल रोडला असताना गर्जे वारंवार गौरी यांना फोन करत होते. मात्र गौरी यांनी फोन उचलला नाही. याच संशयातून अनंत यांनी गाडी पुन्हा घराकडे वळवली. घराबाहेरून आवाज देऊनही गौरी दार उघडत नव्हती. आतून कुठलीही प्रतिक्रिया मिळत नसल्याने अनंत यांनी खिडकीतून घरात डोकावले. यावेळी गौरी यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. अनंत गर्जे यांच्या चौकशीत ही माहिती समोर आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजत आहे.
Anant Garje & Gauri Garje Crime: फेब्रुवारीत झाला होता विवाह
दरम्यान, अनंत आणि गौरी यांचा विवाह फेब्रुवारी महिन्यात बीड येथे झाला होता. बीडमधील आदित्य दंत महाविद्यालयातून गौरी यांनी बीडीएस पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी सेंट जॉर्जेस रुग्णालयात डेंटल असिस्टंट म्हणून काम केले, तर पुढे शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात डेंटल सर्जन म्हणून कार्यभार सांभाळला. सध्या त्या केईएम रुग्णालयात कार्यरत होत्या. विवाहानंतर दाम्पत्य वरळीतील नवीन बीडीडी वसाहतीत राहू लागले. शनिवारी सायंकाळी ‘गौरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे, तिला समजवा,’ असा फोन अनंत यांनी गौरी यांच्या वडिलांना केला. काही वेळानंतर पुन्हा फोन करून गौरी मृत अवस्थेत असल्याची माहिती दिली, असे गौरी यांचे वडील अशोक पालवे यांनी आपल्या जबाबात नमूद केले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.