आम्ही बांगड्या घातलेल्या नाही, मर्द आहोत; प्रफुल पटेलांची सडकसडकून टीका, रोख मात्र कोणाकडे?
प्रफुल्ल पटेल भंडारा : मी आहे ना….मी बघेल आणि ते बघेल…आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाही. आम्हाला ही माहिती आहे, आम्ही मर्द आहे…आपण कोणाला भितो का? टाळी मारू नका, व्होट द्या. आमचे जूने मित्र आता त्यांच्या पुतण्याच्या मागं लागले आहेत. ते कुणाच्या पार्टीत आहे आणि कितव्या पार्टीत गेले घरातील पोरं भटकले आहेत, त्यांच्यामागे जाण्याची गरज नाही. भटकलेला उद्या वापस येईल. पण, भटकलेल्याच्या मागे आपल्याला जायचं नाही. समझनेवाले को इशारा काफी…और ना समझे ओ…. असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या सागर गभणे याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी टोला लगावला.
Prafull Patel : भटकलेल्याच्या मागं जाऊ नका, भटकलेला उद्या वापस येईल
भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीचे सागर करणे आणि पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या पुतण्याने भाजपातून बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारीवर निवडणूक लढत आहे. तुमसर येथे अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेत प्रफुल्ल पटेल यांनी स्वपक्षीय बंडखोर सागर गभने आणि माजी खासदार मधुकर कुकडे यांच्यावर निशाणा साधला.
भंडाऱ्यात सुरू असलेल्या जलपर्यटन केंद्राची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
भंडाऱ्यात सुरू असलेल्या जलपर्यटन केंद्राच्या काही तक्रारी प्राप्त झालेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची चौकशी लावलेली आहे. चौकशीअंती त्या ठिकाणी जे काही चौकशीअंती चुकीचं असेल तर, कारवाई होईल. मात्र, मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार आल्यानं ते याची चौकशी करणार असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भंडाऱ्यात वैनगंगा नदीच्या तीरावर जागतिक दर्जाच्या जलपर्यटन केंद्राचं काम सुरू आहे. मात्र, या कामांमध्ये मोठी अफरातफर करून कोट्यवधी रुपयांचे बिल उचल केल्याचा आरोप करून त्याची तक्रार शिवसेना ठाकरे गटाचे भंडारा जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.