स्मृती मानधनानंतर लग्नाला गेलेल्या टीम इंडियातील खेळाडूंनीही तेच केलं, 24 तासांत सगळे फोटो गायब


स्मृती मानधना यांनी लग्नाच्या सर्व पोस्ट हटवल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारणही तसंच आहे, कारण तिने अचानक आपल्या लग्नाशी संबंधित जवळजवळ सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवले आहेत. आणि  हा निर्णय पाहून तिचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

स्मृती–पलाश यांचे लग्न, तयारी पूर्ण पण…

स्मृती मानधनाचे लग्न तिच्या लाँगटाईम पार्टनर पलाश मुच्छलशी 23 नोव्हेंबर रोजी सांगली येथे होणार होते. कुटुंबीय, नातेवाईक, काही सहकारी खेळाडू सगळे या खास क्षणाचा भाग बनण्यासाठी आले होते. संगीत, हल्दी असे प्री-वेडिंग कार्यक्रमही पार पडले होते. जेमिमा रोड्रिग्ज आणि श्रेयंका पाटील यांच्यासारख्या सहकाऱ्यांनीही या समारंभात हजेरी लावली होती.

वडिलांची तब्येत बिघडली

लग्नाआधीच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. कुटुंबीयांनी सांगितले की, आता त्यांची प्रकृती आधीपेक्षा सुधारत आहे आणि ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. याच काळात स्मृती मानधनाचा होणारा नवरदेव पलाश मुच्छल यांचीही तब्येत बिघडली. काही तपासणीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

स्मृती मानधनानंतर लग्नाला गेलेल्या टीम इंडियातील खेळाडूंनीही तेच केलं

स्मृतीने आपल्या लग्नाच्या सर्व पोस्ट, अगदी प्रपोज केलेला व्हिडिओ सुद्धा डिलीट केला. त्यानंतर जेमिमा आणि श्रेयंनकानेही आपले व्हिडिओ काढून टाकले. यामुळे चर्चांना आणखी उधाण आले, लग्न मोडलं का? दोघांमध्ये काही बिनसलंय का?

कुटुंबाचा खुलासा, लग्न मोडलं नाही, फक्त पुढे ढकलले

या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत कुटुंबीयांनी स्पष्ट केले की, लग्न मोडलं नाही, तर फक्त अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. सध्या संपूर्ण लक्ष स्मृतीच्या वडिलांच्या आरोग्यावर आहे. स्मृती आणि पलाश यांचे जुन्या आठवणींचे फोटो अजूनही त्यांच्या सोशल मीडियावर आहेत.

पलाश मुच्छलचा रोमँटिक प्रपोज

दुसरीकडे, पलाश मुच्छल यांनी स्मृतीला नवी मुंबईतील DY पाटिल स्टेडियममध्ये खास पद्धतीने प्रपोज केले होते. त्यांनी 21 नोव्हेंबरला या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, जो अजूनही त्यांच्या अकाउंटवर दिसत आहे.

हे ही वाचा –

Smriti Mandhana News : स्मृती मानधना नाही तर पलाशने लग्न पुढे ढकललं; लग्नाच्या दिवशी नेमकं काय घडलं? आईने सगळंच सांगितलं

आणखी वाचा

Comments are closed.