ठाकरेंच्या हिंदीसक्ती विरोधाला दक्षिणेचं बळ; उदयनिधी स्टॅलिन म्हणाले,आम्ही भाषा युद्धासाठी सज्ज
एबीपी सदर्न रायझिंग समिट 2025 चेन्नई: केंद्र सरकारने हिंदीसक्ती (Hindi Language) करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला कठोर विरोध केला जाईल, असा इशारा तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी दिला आहे. तसेच द्रविड मुनेत्र कळघम (DMK) पक्ष “भाषा युद्ध” लढायलाही तयार असल्याचं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. उदयनिधी स्टॅलिन चेन्नईत झालेल्या ABP Network च्या Southern Rising Summit 2025 मध्ये बोलत होते.
देशात सत्ताकेंद्रितीकरण वाढत आहे” आणि राज्यांच्या अधिकारांना धोका निर्माण होत आहे. जर हिंदी आमच्यावर लादली गेली, तर तमिळनाडू भाषा युद्धासाठी तयार आहे. आम्ही नेहमीच आमची भाषा, आमचे राज्याचे हक्क, लोकशाही आणि आता जनतेच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण केले आहे, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्रिभाषा सूत्रावरुन कडाडून विरोध केला होता. तसेच महाराष्ट्रातील हिंदीसक्तीविरोधात मोठं आंदोलनही पुकारलं होतं. त्यामुळे ठाकरेंच्या हिंदीसक्तीविरोधाला दक्षिणेचंही बळ मिळाल्याचं दिसून येतंय.
उदयनिधी स्टॅलिन यांची केंद्रातील भाजपा सरकारवर टीका- (Udhayanidhi Stalin)
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार जाणूनबुजून संघराज्यव्यवस्था कमकुवत करत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्यांना राजकीयदृष्ट्या कमजोर करणे आणि राजकीयदृष्ट्या सक्षम राज्यांना आर्थिकदृष्ट्या कमजोर करणे हा त्यांचा उद्देश आहे, असा आरोपही उदयनिधी स्टॅलिन यांनी केला आहे. तमिळनाडूवर अन्यायकारक कर-वाटप, निधी अडवणे किंवा विलंब, केंद्र सरकारने लादलेल्या योजना, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि आता प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (delimitation) यांचा परिणाम होत असल्याचंही उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.
चेन्नईत ABP Network चं South Rising Summit चे आयोजन- (ABP Southern Rising Summit 2025)
ABP Network च्या South Rising Summit चा तिसरा संस्करण चेन्नईतील ITC Grand Chola येथे Ready for the Future: Innovation, Transformation, Inspiration या थीमवर आयोजित करण्यात आले आहे. दक्षिण भारताचा राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रभाव राष्ट्रीय स्तरावर कसा विस्तारत आहे, यावर या शिखर परिषदेतील चर्चांचा केंद्रबिंदू आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह या परिषदेत तमिळनाडूचे शालेय शिक्षण मंत्री अंबिल महेश पोय्यमोझी, भाजपचे माजी राज्याध्यक्ष के. अन्नामलाई, PMK नेता अंबुमणी रामदोस आणि अभिनेत्री मालविका मोहनन यांचाही सहभाग आहे. कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे आणि प्रेरणादायी अनुभवांचाही समावेश आहे. ज्येष्ठ गायिका कविता कृष्णमूर्ती कार्यक्रमात सादरीकरण करतील, तर कॉमेडियन श्रद्धा जैन (Aiyyo Shraddha) रंगमंचावर आपली कला सादर करणार आहेत. संपूर्ण परिषदेचे प्रसारण ABP Network च्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट केले जात आहे.
उदयनिधी स्टॅलिन काय काय म्हणाले?, Video:
आणखी वाचा
Comments are closed.