पोर्टेबल सोनोग्राफी यंत्राने कारमध्येच गर्भलिंग निदान, डॉक्टरला अटक, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ


नाशिक क्राईम न्यूज : नाशिक जिल्ह्यातून एक अतिशय खळबळपालक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान (Sex Determination Racket) करणारे रॅकेट उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. कारमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी (Portable Sonography) यंत्रासह डॉक्टर देखील यात आढळून आले आहे. या घटनेने नाशिकसह (नाशिक क्राईम न्यूज) वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. चाळीसगावचे डॉ. बाळासाहेब पाटील यांच्यावर PCPNDT कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांच्या वाहन तपासणीत 17 मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान आता हा गुन्हा सिद्ध झाला असून पुढील कारवाई पोलीस करत आहे.

नाशिक क्राईम न्यूज : सोनोग्राफी यंत्राची विनापरवानगी विक्री केल्याबद्दल कंपनीवरही गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या तपासात चारचाकीत पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र बाळगून गर्भलिंग निदान केल्याचं उघड झालं आहे. इंदिरानगर पोलिसांच्या वाहन तपासणीत 17 मार्च रोजी प्रकार उघडकीस आला होता. त्यानुसार गुन्हा सिद्ध झाला असून आता कारवाई करण्यात आली आहे. तर सोनोग्राफी यंत्राची विनापरवानगी विक्री केल्याबद्दल GE Healthcare या कंपनीवरही गुन्हा दाखल करत सहआरोपी ठरवण्यात आलं आहे. पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र नाशिक पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते. तर आता महापालिकेच्या चौकशीत कलम 3, 6, 18, 23, 25, 26, 29 अन्वये गुन्हा सिद्ध झाला आहे. या प्रकरणी दोषी ठरल्यास डॉक्टरला पाच वर्षांपर्यंत शिक्षा व वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द होण्याची शक्यता आता व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी डॉक्टरांविरोधात पुण्यातही तक्रार दाखल असल्याची माहिती आहे. मात्र परवानगीशिवाय यंत्र विक्री व वाहतूक करत गुन्हेगारी केल्यानं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Vasai Crime : नायगावमध्ये चेन्स्नॅचिंगचा प्रयत्न फसला; धाडसी महिलेने चोरटा पकडला

वसईच्या नायगाव परिसरात चोरट्यांच्या साखळी चोरीच्या घटनांमध्ये भर घालत सोमवारी आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. अमोल नगर स्थित निलांबर सोसायटीमध्ये मदतीच्या नावाखाली एका घराच्या पहिल्या मजल्यावर गेलेल्या अज्ञात तरुणाने घरात एकटी असलेल्या महिलेची सोन्याची चेन हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान महिला आणि चोरट्यामध्ये झटापट झाली. तरीही महिलेने धाडस दाखवत चोरट्याचा पाठलाग केला आणि इमारतीबाहेर पळत असताना त्याला पकडण्यात यश मिळवले. घटनेदरम्यान महिलेनं हार न मानता दाखवलेलं साहस परिसरातील सर्वांकडून कौतुकास्पद ठरले.

महिलेने चोरटा पकडल्याचे पाहताच सोसायटीतील नागरिकांनी मदतीला धाव घेत चोरट्याचे हात बांधून त्याला चांगलाच चोप दिला. तत्पश्चात चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, दिवसा-दिवसा सोसायट्यांमध्ये चोर्‍या घडत असल्याने रहिवाशांमध्ये संताप निर्माण झाला असून परिसरात गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलीस तपास सुरू असून आरोपीकडून इतर गुन्ह्यांचा तपास घेतला जाण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.