टी-20 क्रिकेट विश्वचषकाचं बिगुल वाजलं, 7 फेब्रुवारीपासून सुरुवात, रोहित शर्माकडे मोठी जबाबदारी


T20 विश्वचषक 2026 : टी-20 क्रिकेट विश्वचषकाच्या (T20 World Cup 2026)  वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. भारत-श्रीलंका या दोन देशामध्ये विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. 7 फेब्रुवारी 2026 पासून टी-20 विश्वचषकाच्या 10 व्या पर्वाला होणार सुरुवात होणार आहे. यामध्ये एकूण 20 संघांचा समावेश असणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह ( Jay Shah) तसेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हरमनप्रीत कौर यांच्या उपस्थितीत टी-20 क्रिकेट विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, या विश्वचषकात भारताचा धडाकेबाज फलदंज रोहित शर्मावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 विश्वचषकाचा ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

10 वर्षांनंतर पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच भारतात आयोजन

दरम्यान, 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच भारतात आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईसह, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता आणि अहमदाबाद येथे विश्वचषकाचे सामने होणार आहेत. तसेच श्रीलंकेतील चार ठिकाणी सामने होणार आहेत. रोहित शर्मा टी-20 विश्वचषकाचा ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहे. दरम्यान, या टी-20 विश्वचषकाचे सामने भारतासह श्रीलंकेत देखील खेळवले जाणार आहेत. भारताचा A ग्रुपमध्ये समावेश असून, यामध्ये पाकिस्तानसह अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्सचा समावेश आहे.

कोणत्या ग्रुपमध्ये कोणत्या संघाचा समावेश?

अ गट- भारत, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया, नेदरलँड.
ग्रुप B – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान.
ग्रुप C- इंग्लंड, वेस्ट इंडिज, इटली, बांगलादेश, नेपाळ.
ग्रुप D – दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युएई, कॅन

15 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार

दरम्यान, भारताचा पहिला सामना हा अमेरिकेबरोबर असणार आहे. हा सामना 7 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारताचा दुसरा सामना हा नामिबिया विरुद्ध नवी दिल्लीत खेळवला जाणार आहे. हा समाना 12 फेब्रुवारी खेळवला जाणार आहे. तर तिसरा सामना हा पाकिस्तानबरोबर खेळवला जाणार आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. त्यानंतर 18 फेब्रुवारीला भारतचा सामना नेदरलँड् विरुद्ध अहमदाबादमध्ये होणार आहे. दरम्यान, भारतात हे सामने मुंबईसह, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता आणि अहमदाबाद येथे खेळवले जाणार आहेत. तसेच श्रीलंकेतील चार ठिकाणच्या मैदानावर देखील टी-20 सामने खेळवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?

आणखी वाचा

Comments are closed.