आधी मला जिवंत राहायचंय, तरच पक्षासाठी काम करू शकेल; सलील देशमुख नेमकं असं का म्हणालेत?
Salil Deshmukh नागपूर : जोवर माझी तब्येत पूर्णपणे बरी होत नाही, तोवर मी सिक लिव्हवर आहे. कारण आधी मला मी जिवंत रहायचे आहे, जिवंत राहिलो त्यानंतरच पक्षासाठी काम करू शकेल, असे म्हणणं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख यांचे. काही दिवसांपूर्वी तब्येतीच्या कारण समोर करत सलील देशमुख (Salil Deshmukh Resignation) यांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा देत राजकारणापासून दूर राहण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पक्षाने त्यांचा राजीनामा नामंजूर केला होता. सुप्रिया सुळे सारख्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांना पक्षासाठी काम करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर ही सलील देशमुख आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याबाबत त्यांच्याशी संभाषण केली असता त्यांनी हि अभिप्राय दिलीय. ते नागपूरात्री बोलत होते.
खरी नाराजी काटोल येथील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी?
सुप्रियाताई मला पक्षात राहण्यासाठी सांगत असल्या तरी त्याआधी मी जिवंत राहिलं पाहिजे आणि त्यासाठी माझी तब्येत चांगली होणे गरजेचे आहे. असेहे देशमुख म्हणाले. दरम्यान सलील देशमुख यांची खरी नाराजी काटोल येथील नगराध्यक्ष (Nagarpanchayat Election) पदाच्या उमेदवारी संदर्भात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने त्या ठिकाणी नगराध्यक्ष पद स्वतःकडे न ठेवता ते शेकापकडे दिला आहे. तसेच सलील देशमुख यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवत मत विभाजन घडवणाऱ्या शेकापचे नेते राहुल देशमुख यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यामुळे सलील देशमुख नाराज झाल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या बापाच्या गोष्टी सांगत बसत नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते 24 बाय 7 काम करतात. फक्त इलेक्शन आले म्हणून झोपून उठून येत नाही. फक्त भाषण देऊन लोकांची दिशाभूल करत नाही किंवा पैसे घेऊन कुणाची बी टीम म्हणून काम करत नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या बापाच्या गोष्टी सांगत बसत नाही, असे सांगून सलील देशमुख यांनी शेकापचे राहुल देशमुख यांच्या विरोधात जोरदार आगपाखड केलीहे. मला राहुल देशमुखच्या तुलनेत खूप जास्त मतं मिळाली. राहुल देशमुख ची डिपॉझिट जप्त होऊन तो पाचव्या नंबरवर होता. त्याला महत्त्व देण्याचे काही कारण नाही. तो त्या लायकीचाच नाही, असेहे सलील देशमुख म्हणाले. त्यामुळे त्यांची खरी नाराजी काटोल मधील नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आणि शेकापच्या राहुल देशमुखांवर असल्याचे समोर आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.