आधी सगळे फोटो डिलीट केले, आता स्मृतीच्या टीम इंडियातील मैत्रिणीने पलाश मुच्छला अनफॉलो केलं, लग्


स्मृती मानधना-पलाश मुच्छाळ गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड इंडस्ट्री, क्रिकेटविश्व आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चा असलेले स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व घडामोडीनंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती ढासळली आणि त्याला सांगलीतील रुग्णालयात नेण्यात आलं.

सध्या पलाश मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहे. लग्न स्थगित झाल्यापासून सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण आलं आहे. काही पोस्टमध्ये तर पलाश मुच्छलवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

राधाचा पलाशला अनफॉलो केल्याचा दावा

सोशल मीडियावर अनेक युजर्स असा दावा करत आहेत की, स्मृती मानधनाची जिवलग मैत्रीण आणि भारतीय स्पिनर राधा यादवने पलाश मुच्छलला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केलं आहे. अशा प्रकारचे अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. मात्र एबीपी माझा अशा कोणत्याही दाव्याची पुष्टी करत नाही.

राधा यादव स्मृतीच्या लग्नासाठी उपस्थितही होती. तिच्यासोबत जेमिमा रॉड्रिग्ज आणि श्रेयंका पाटील यांनीही समारंभाला हजेरी लावली होती. मात्र जेमिमा आणि श्रेयंका अद्याप पलाशला सोशल मीडियावर फॉलो करत आहेत. याआधी, लग्न पुढे ढकलल्यानंतरच्या दिवशी स्मृती मंधानानेही आपल्या लग्नाच्या सर्व फोटोंना इंस्टाग्रामवरून हटवलं होतं, त्यानंतर तर लग्न तुटल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

पलाशची आई अमितांचा खुलासा

दरम्यान, पलाश मुच्छलच्या आई अमिता मुच्छल यांनीही माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी माहितीत सांगितले की, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचे कळताच फेऱ्या आणि पुढील सर्व विधी पुढे ढकलण्याचा निर्णय स्वतः पलाशने घेतला होता. त्या म्हणाल्या की, “पलाशचा मानधना कुटुंबाशी, विशेषतः स्मृतीच्या वडिलांशी खूप जिव्हाळा आहे. स्मृतीपेक्षा जास्त ते दोघे एकमेकांशी जवळचे आहेत. म्हणूनच हे घडल्यानंतर फेऱ्या थांबवण्याचा पहिला निर्णय पलाशनेच घेतला. मानधना सर पूर्ण बरे होईपर्यंत तो फेऱ्या घेणार नाही, असा त्याचा शब्द आहे.”

पलाशने स्मृती मानधनाचा विश्वासघात केल्याची चर्चा….

पलाशने स्मृती मानधनाचा विश्वासघात केल्याचे आणि तो मेरी डिकॉस्टा या एका मुलीसोबत चॅट करत असल्याचे स्क्रीन शॉट सोशल माध्यमावर व्हायरल होत आहेत. पलाश मुच्छल आणि मेरी डिकॉस्टाचे चॅट हे स्मृती सोबत पलाशचे लग्न ठरल्यानंतरचे असल्याचे सांगितले जाते. या चॅटची एबीपी माझा पुष्टी करत नाही. मात्र, या व्हायरल होत असलेल्या चॅटबाबत पलाश किंवा स्मृती मानधना यांच्याकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.

हे ही वाचा –

Palash Muchhal and Mary Dcosata: पलाश मुच्छल अन् मेरी डिकॉस्टाचं अफेअर? मोबाईलवरचं सिक्रेट चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.