पुण्यातील विश्रांतवाडीत बॉम्बमध्ये वापरण्यात येणारं जिलेटिन अन् वायर सापडली; परिसरात दहशतीचं वा
पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी, टिंगरेनगर येथील विद्यानगर गल्ली क्र. 8 येथील साईकृपा लॉजजवळ बॉम्बमध्ये वापरण्यात येणारे जिलेटिन व वायर आढळून आल्या आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली (Pune News) असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी (Pune News) तत्परतेने परिसर पिंजून काढला. टिंगरेनगर येथे विद्यानगर आरोग्य कोठीमधील सफाईसेविका स्वच्छतेचं काम करीत असताना या ठिकाणी मोकळ्या प्लॉटच्या पत्र्याच्या गेटजवळच्या एक पोते रस्त्यावर बाजूला ठेवलेले दिसून आले. त्या पोत्यात त्यामध्ये स्फोटक सदृश्य वस्तू असल्याचे आढळून आले. (Pune News)
Pune News: खडक फोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य
ही माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यांनी तत्परतेने शोध घेतला असता त्यात 138 जिलेटिन कांड्या व 135 डिनोनेटर वायरसह, एकूण 10 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. हे खडक फोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असून ते एका बांधकाम व्यवसायिकाचे आहे. बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांनी मुद्देमाल ताब्यात घेऊन तपासणी केली आहे. पुढील कार्यवाही चालू आहे.
Pune News: धोकादायक साहित्य हलगर्जीपणाने लोकांच्या जीवितास धोका निर्माण…
या प्रकरणी धोकादायक साहित्य हलगर्जीपणाने लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे ठेवल्याबद्दल राहुल सुदाम वाजे, किसन धनवते (दोघेही रा. शिरूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार यशवंत किरवे यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करणारे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ताराचंद सुडगे असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल माने करत आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांच्या नेतृत्वाखाली तपास चालू आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, परंतु नागरिकांनी अशा संशयास्पद वस्तू मिळाल्या, तर लगेच पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी केले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.