अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंबाजोगाईच्या सभेत बोलताना जीभ घसरली होती. अजित पवारांच्या या विधानावरून त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. या प्रश्नावर अखेर आज अकोला जिल्ह्यातील अकोटच्या सभेत अजित पवार यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. आपण अंबाजोगाईत जे बोललो ते स्वच्छतेच्या मुद्द्यावरून बोललो. माध्यमांनी ते चालवलंय. मात्र, बोलतांना एखादा शब्द निघतोय. मात्र, अंबाजोगाईच्या सभेतील तो शब्द निघायला नको होता. याबद्दल आपण लोकांची दिलगिरी व्यक्त करत असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार आज अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आले होते.
Ajit Pawar: राजकारणात राहायचं असेल तर गुत्तेदारी करू नका
दरम्यान, आपल्या स्पष्टवक्तेपणावरून होणाऱ्या टिकेबद्दलही अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. मी कडक बोलणारा माणूस आहे असं म्हणतात. मात्र, मी कामाचा माणूस आहे. सकाळी सहा वाजता मी पासून कामाला लागतोय. माझं काम असल्यामुळेच लोक मला आठ आठ वेळा लाखभराच्या मतांनी निवडून देत असल्याचं अजित पवार म्हणालेत. दरम्यान, राजकारणात राहून गुत्तेदारी करणाऱ्यांवरही अजित पवारांनी जोरदार टीका केली आहे. राजकारणात राहायचं असेल तर गुत्तेदारी करू नका आणि गुत्तेदारी करायची असेल तर राजकारणात येऊ नका, असं अजित पवार म्हणालेत. नगराध्यक्ष असलेल्यांच्या घरातीलच लोक गुत्तेदारी करतात. त्यामुळे कामाचा दर्जा कसा राहील?, असा सवाल त्यांनी केला आहे.
Ajit Pawar: नेमकं काय म्हणालेत अजित पवार?
मी अंबाजोगाईत जे बोललो ते स्वच्छतेवरून बोललो. माध्यमांनी ते चालवलं. बोलतांना एखादा शब्द निघतो. आम्ही पिंपरी चिंचवडबारामतीत काम केलीत तशीच सर्व ठिकाणी करायची आहेत. मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला ‘भिकारपणा’. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी कडक आहे असं म्हणतात. मी कामाचा माणूस आहे. टीव्हीवाले काय दाखवतात यासाठी आम्ही काम करीत नाही. तर अजित पवार म्हणाले, राजकारणात राहायचं असेल तर गुत्तेदारी करू नका आणि गुत्तेदारी करायची असेल तर राजकारणात येऊ नका. नगराध्यक्ष असलेल्यांच्या घरातीलच लोक गुत्तेदारी करतात. त्यामुळे कामाचा दर्जा कसा राहील? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.