वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह घेण्यास नकार


सोलापूर : वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाल कंटाळून ग्रामसेवकाने (Gramsevak) आत्महत्या केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पीडित कुटुंबीयांनी न्यायासाठी पोलिसांत धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखला करता येत नसल्याचे सांगतिले. पीडित ग्रामसेवकाच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे म्हटले. त्यामुळे, काही काळ बार्शी (Solapur) ग्रामीण रुग्णालयात चांगलाच तणाव झाल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्य अधिकाऱ्यांच्या नावाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही, तुम्ही रितसर जबाब नोंदवा, असे येथील पोलीस (Police) निरीक्षक बालाजी कुकडे यांनी म्हटले. मात्र, कुटुंबीय गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

वरिष्ठ अधिकारी सातत्याने छळत असल्याने आणि पैशाची मागणी करत असल्याने या जाचाला कंटाळून बार्शीत ग्रामसेवकाने गळास लावून आपले जीवन संपविल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वरीष्ठांचा जाच आणि कर्मचाऱ्यांचा छळ हे अलिकडच्या काळात वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. प्रकाश बाविस्कर असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. आता या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही, तोर्यंत बॉडी ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा बाविस्कर कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यावरुन, रुग्णालयात बराच काळापासून तणावाचे वातावरण दिसून आले.

कुटुंबीयांचा रुग्णालयात ठिय्या

सर्व कुटुंबीय ठिय्या मांडून बसले आहेत. पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, पण बाविस्कर कुटुंबीयांनी मात्र आधी गुन्हा दाखल करा, असा पवित्रा घेतला आहे. प्रकाश बाविस्कर हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. त्यांचे काही वरिष्ठ अधिकारी त्यांना या ना त्या कारणावरून सतत छळत होते. काही दिवसापूर्वी त्यांना दप्तर तपासणी करायची आहे, असे म्हणत त्यांच्याकडे पैशाचीही मागणी करण्यात आल्याचे आरोप कुटुंबीयांनी केले. सतत हे अधिकारी पैसे मागत असल्याचेही कुटुंबियांनी सांगितले. या सगळ्या जाचाला कंटाळून 19 नोव्हेंबर रोजी प्रकाश बाविस्कर यांनी आपल्या राहत्या घरी गळास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, घरात त्यांच्या कुटुंबीयांना दुसऱ्या खोलीत खुर्ची पडल्याचा आवाज आला आणि त्यांच्या पत्नी खोलीकडे धावल्या. त्यांनी धावपळ करुन लगेचच त्यांना रूग्णालयात नेले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, 26 नोव्हेंबर रोजी उपचार घेत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यामुळे आता बाविस्कर कुटुंबीयांनी या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, पोस्टमार्टेमसाठी त्यांचा मृतदेह रूग्णालयात नेण्यात आला आहे. पण कुटुंबीयांना पोस्टमार्टम करण्यापूर्वी विचारणा देखील करण्यात आली नाही. याशिवाय जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात येणार नाही, अशी भूमिका संतप्त कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

हेही वाचा

आपल्या नातवाला बॉम्बे स्कॉटिशपेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या; भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार

आणखी वाचा

Comments are closed.