हिंजवडीत धक्कादायक प्रकार; सेविका अन् मदतनीसांनी 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडलं, बैठकीला पोह
पुणे: आयटी हिंजवडीत धक्कादायक (Pune News) घटना घडली आहे. अंगवाडी सेविका अन् मदतनीस यांनी मिळून वीस लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रताप समोर आला आहे. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या (Pune News) व्हिडिओत मुलं अक्षरशः रडत असल्याचं दिसून येतं आहे. हे पाहून पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक तीनच्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केला आहे. (Pune News)
Pune News: लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून जाणं धोकादायक
ग्रामपंचायतीत एका माजी सरपंचाने बैठकीला बोलावलं म्हणून आम्ही मुलांना आत ठेवून अंगवाडीला कुलूप लावला, असा धक्कादायक खुलासा या दोघींनीही केला आहे. काल (बुधवारी, ता २६) सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान हा धक्कादायक (Pune News) प्रकार घडला. उपस्थितांनी ही बाब मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना कल्पना दिली, तेव्हा गिराम यांनी शिंदे आणि साखरे या दोघींना बैठक सोडून तातडीनं अंगणवाडीचं कुलूप खोलण्याचे आदेश दिले. काही वेळासाठी का असेना असं लहानग्यांना (Pune News) अंगणवाडीत कोंडून जाणं, हे किती धोकादायक आणि संतापजनक आहे. हे व्हिडिओतील मुलांच्या (Pune News) आक्रोशावरून स्पष्ट होतंय. आता बाल विकास प्रकल्प अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचे असेल. (Pune News)
हिंजवडीत धक्कादायक प्रकार, सेविका अन मदतनीस वीस लहानग्यांना अंगवाडीत कोंडून बैठकीला गेल्या. मुलं रडत बसली. कालच्या घटनेचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती#पुणेन्यूज #hinjewadinews pic.twitter.com/g7DHcLNpGv
— अंकिता शांतीनाथ खाणे (@KhaneAnkita) 27 नोव्हेंबर 2025
Pune News: नेमकं काय घडलं?
ग्रामपंचायतीतील एका माजी सरपंचाने बोलावलेल्या बैठकीसाठी जाण्यासाठी दोन्ही अंगणवाडी सेविकांनी मुलांना केंद्रातच बंद ठेवून अंगणवाडीला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा प्रसंग काल (बुधवारी, ता २६) सकाळी सुमारे ११ ते १२ या वेळेत घडला. उपस्थितांनी ही गंभीर बाब तातडीने मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांच्याकडे पोहोचवली. त्यानंतर गिराम यांनी सेविका शिंदे आणि साखरे यांना तत्काळ बैठक सोडून अंगणवाडीचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले.
लहानग्या मुलांना अगदी काही काळासाठीसुद्धा अशा प्रकारे बंदिस्त करून ठेवणे किती घातक आणि धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय व्हिडिओतील मुलांच्या रडण्याच्या आवाजातून स्पष्टपणे येत आहे. या गंभीर निष्काळजीपणावर आता बाल विकास प्रकल्प अधिकारी कोणती कार्यवाही करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेनंतर या चिमुकल्यांच्या पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.