73 स्लॉट्स, 41 कोटी रुपये, आज कोणावर पडणार पैशांचा पाऊस? सर्वांच्या नजरा विश्वविजेत्या मुलींवर
WPL मेगा लिलाव उर्वरित स्लॉट पर्स रक्कम: महिला प्रीमियर लीग 2026 साठीचा मेगा ऑक्शन गुरुवार 27 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्लीत रंगणार आहे. या वेळी एकूण 277 खेळाडूंच्या नशिबाचा निर्णय ऑक्शन टेबलवर होणार असून यात 194 भारतीय आणि 83 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, उपलब्ध जागा फक्त 73 असल्यामुळे केवळ 73 जणींच्याच नशिबाला हिरवा कंदील मिळणार आहे. प्रत्येक फ्रेंचायझीला किमान 15 आणि कमाल 18 खेळाडू स्क्वाडमध्ये ठेवणे बंधनकारक आहे.
विश्वविजेत्या खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
भारतीय महिला संघाच्या विश्वविजेत्या खेळाडूंवर ऑक्शनदरम्यान विशेष नजर असेल. जास्तीत जास्त बेस प्राईस 50 लाख ठेवण्यात आला आहे. यामध्ये वर्ल्ड कप प्लेयर ऑफ द टूर्नामेंट दीप्ती शर्माचा समावेश आहे. तिच्यासाठी अनेक टीम्समध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यूपी वॉरियर्सने दीप्तीला रिटेन केले नव्हते, त्यामुळे तिच्यावर अधिक लक्ष केंद्रीत आहे.
पॉवर-हिटर किरण नवगिरेवर होणार पैशांचा पाऊस?
40 लाखांच्या बेस प्राईसमध्ये सामील असलेली धडाकेबाज बॅटर किरण नवगिरे ही ऑक्शनची मोठी आकर्षणस्थानी राहणार आहे. तिच्यासाठी सर्व फ्रेंचायझी झुंज देताना दिसू शकतात. 30 लाख बेस प्राईस असलेल्या वेगवान गोलंदाज क्रांती गौड, स्पिनर श्री चरणी, स्टार ऑलराउंडर स्नेह राणा यांच्यावर देखील तुफानी बोली लागण्याची शक्यता आहे.
तर युवा लेफ्ट-आर्म स्पिनर वैष्णवी शर्मा हिचा बेस प्राईस 10 लाख असून, तिच्यावरही या वेळी चांगली बोली लागू शकते. विदेशी सुपरस्टार्सवरही नजर असेल, ज्यामध्ये मेग लॅनिंग, एलिसा हीली, एमेली कर, लॉरा वोल्वार्ट आणि सोफी एक्लेस्टोन ही विदेशी मोठी नावंही या मेगा ऑक्शनची शोभा वाढवणार आहेत.
सर्व 5 संघांसाठी रिटेन्शन लिस्ट
- दिल्ली कॅपिटल्स – अॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, निकी प्रसाद
- मुंबई इंडियन्स – हरमनप्रीत कौर, अमनजोत कौर, हेली मॅथ्यूज, नॅट सीवर ब्रंट, जी कमलिनी
- आरसीबी – स्मृती मानधना, एलिस पेरी, रिचा घोष, श्रेयंका पाटील
- यूपी वॉरियर्स – श्वेता सेहरावत
- गुजरात जायंट्स – ॲशले गार्डनर, बेथ मूनी
प्रत्येक संघाकडे किती पैसे आणि उपलब्ध स्लॉट आहेत…
- दिल्ली कॅपिटल्स – पर्स 5.70 कोटी, 13 स्लॉट, 4 परदेशी स्लॉट
- गुजरात जायंट्स 9 कोटी, 16 स्लॉट, 4 परदेशी स्लॉट
- मुंबई इंडियन्स 5.75 कोटी, 13 स्लॉट, 4 परदेशी स्लॉट
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 6.15 कोटी, 14 स्लॉट, 5 परदेशी स्लॉट
- यूपी वॉरियर्स 14.50 कोटी, 17 स्लॉट, 6 परदेशी स्लॉट
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.