निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेशन, नितेश राणे म्हणाले, हमाम मैं सब नंगे है, आम्ही धिंगाणा…; कोकणात


Nitesh Rane On Nilesh Rane: शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काल (26 नोव्हेंबर) थेट मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन (Nilesh Rane Sting Opration Malvan) करत विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी पोहोचले. यावेळी निलेश राणेंना विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम आढळून आली. विजय किनवडेकर यांच्या घरी बेहिशोबी 25 लाख रुपये मिळाले. एका खोलीत हिरव्या रंगाच्या पिशवीत हे पैसे असल्याचे दिसून आले.

रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) मालवणमध्ये येऊन गेले, कालपासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे, असे म्हणत निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले. पैसे वाटप करुन निवडणूक लढवायची पद्धत आहे का? मैदानात येऊन लढा. त्या घरात अजून पैशाच्या बॅग आहेत, असा आरोपही निलेश राणेंनी केला. भाजपचे कार्यकर्ते कोण कोण पैसे वाटप करतात, याची यादी देणार असून पप्पा तवटे, रुपेश कानडे, रणजीत देसाई, मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन वाटत आहेत. रोज यांच्याकडे बॅग पोहोचवण्याची यंत्रणा तयार असल्याचा आरोपही देखील निलेश राणेंनी केला. मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की रविंद्र चव्हाण जेव्हा जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात तेव्हा वेगळं वातावरण निर्माण होतो. ते काल जिल्ह्यात आले. मला थोडा संशय आला की हे असेच सहज आलेले नाहीत, अशी टीकाही निलेश राणेंनी एबीपी माझाशी बोलताना केली.

निलेश राणेंच्या मालवणमधील स्टिंग ऑपरेशननंतर आणि केलेल्या टीकेवरुन राज्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. निलेश राणेंच्या आरोपावर भाजपाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. आता मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील निलेश राणेंनी भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या धाडीवर भाष्य केलं आहे. रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्येक जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात जावं लागतं. राजकीय चष्म्याने त्याला पाहावं. उद्या आम्ही मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल बोललो आणि असा धिंगाणा घातला तर?, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला.

हमाममध्ये सगळे नागडे आहेत – नितेश राणे (Nitesh Rane On Nilesh Rane)

आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय? आमच्या पक्षाची कोणी बदनामी करू नये. प्रत्येकाचे व्यवसाय आहेत. जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार हमाम मैं सब नंगे है, असं म्हणत  मंत्री आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवर प्रतिक्रिया दिली. त्यामुळे कोकणात आता नितेश राणे आणि निलेश राणे या बंधूंमधील राजकीय वाद टोकाला पोहोचल्याचं दिसून येत आहे.

युतीची चर्चा करण्याची वेळ निघून गेलीय- नितेश राणे (Nitesh Rane vs Nilesh Rane)

रवींद्र चव्हाण यांनी मला अजून पूर्णपणे ओळखलेलं नाहीय. आम्हाला युती करायची होती, तुम्ही का केली नाही?, तुम्ही साधा फोनही उचलला नाही, असं निलेश राणे म्हणाले.  भाजपचे पदाधिकारी रवींद्र चव्हाण यांच्या पगारावर आहेत, असंही निलेश राणेंनी सांगितले. यावर देखील नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपची पद्धत आहे, केव्हातरी तुम्ही समजून घ्या…प्रक्रियेचा भाग असतो. स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांच मत घेऊन तो प्रस्ताव प्रदेशाकडे पाठवला जातो. आता युतीची चर्चा करण्याची वेळ निघून गेलीय, असंही नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Nilesh Rane: सर्व मार्ग बंद करुन बेडरुममध्ये घुसले; निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड, पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्या, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.