राजकोट किल्यावर शिवरायांचा पुतळा नव्याने उभारणीच्या कामाला वेग; बड्या शिल्पकारावर जबाबदारी

सिंधुदुर्ग : मालवण किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात 60 फूट पुतळा नव्याने साकारण्यात येणार आहे, ज्याचं काम वेगाने सुरू झालं आहे. सध्या राजकोट किल्ल्यावर खोदकाम सुरू आहे. तर एका मोठ्या शिल्पकारावर संपूर्ण पुतळा उभारणीच्या कामाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.

राज्य सरकारने याठिकाणी 60 फूट उंच पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. देशभरात मोठमोठे पुतळे दर्जेदार पद्धतीने उभरण्याचा मोठा अनुभव त्यांना आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.