टीम बांधण्यापासून फायनलच्या थरारपर्यंत; विश्वविजेत्या अमोल मुझुमदारांनी ‘एबीपी माझा’च्या महाकट्
अमोल मुझुमदार महाकट्टा: आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर (India beat South Africa Women World Cup 2025 Final) विजय मिळवला आहे. भारतानं नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं पहिल्यांदा आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकला. या विजयानंतर आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या स्पर्धेआधी टीम इंडिया कशी बांधली, याबाबत भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्यप्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी ‘एबीपी माझा’च्या महाकट्ट्यावर (Amol Muzumdar Mahakatta) खुलासा केला आहे.
अमोल मुझुमदार काय काय म्हणाले? (Amol Muzumdar ABP Mahakatta)
मी जेव्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा मला भारताकडून खेळायचंय, मला विश्वचषक जिंकायचाय, असं काही मनात नव्हतं. मला भारताकडून खेळण्याची संधी मिळत नव्हती. तेव्हा मला वाटलं काहीतरी वेगळं करावं. मलाही डिप्रेशन आलं होतं. परंतु मग मी विचार केला की मी क्रिकेट का खेळतोय?, तर आनंदासाठी खेळतोय. त्यामुळे मी सगळं बाजूला ठेवून कारकीर्द सुरु ठेवली असं अमोल मुझुमदार म्हणाले. 2023 मध्ये माझी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्यप्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. यावेळी संघातील सर्व खेळाडूंसोबत बैठक झाली. साधारण 2 डिसेंबर रोजी ही बैठक झाली. त्यावेळी मी खेळाडूंसाठी पहिला प्रश्न होता, What Is Your Ultimate Goal?, यावर एक वाक्य आलं, सर..विश्वचषक जिंकायचा आहे. मग हेच वाक्य मी एका बोर्डवर लिहिलं आणि इकडूनच सुरुवात झाली, असं अमोल मुझुमदार म्हणाले.
मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी आल्यानंतर कोणते आव्हान होते?
भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्यप्रशिक्षकपदाची जबाबदारी आल्यानंतर अनेक गोष्टी विस्कळीत होत्या. मला वेळ मिळाला तर या गोष्टी सुधारु शकतो, हे मला महिती होतं. मी प्रथम हरमनप्रीत कौरला फोन केला. मी इतर कोणाशीही बोलण्यापेक्षा हरमनप्रीत कौरशी बोललो. साधारण एक तास आम्ही फोनवर चर्चा केली. हरमनप्रीत कौरने अनेक गोष्टी मला सांगितल्या. क्रिकेटमध्ये कर्णधारचं महत्वाचा असतो, असं अमोल मुझुमदार यांनी सांगितले.
विश्वचषकासाठी कशी बांधली टीम?
फिटनेस एक महत्वाचा मुद्दा होता. मी दर 10 दिवसांनी फिटनेस कॅम्प आयोजित करत होतो. यावेळी आम्ही फक्त फक्त फिटनेसवर लक्षकेंद्रीत केलं. हरमनप्रीत कौर आणि मी एकत्र येऊन चर्चा करुन अनेक बदल टीम इंडियात आणले, असं अमोल मुझुमदार यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाच्या सामन्यासाठी रणनिती काय होती?
एक गोष्ट माझ्यासाठी महत्वाची होती. जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल जिंकलो, त्यावेळी सगळ्यांच्या भावना निघून गेल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघातील अनेक खेळाडू भावनिक होऊन खेळते होते. मी मुख्यप्रशिक्ष म्हणून हे सगळं बघत होतो, असं अमोल मुझुमदार म्हणाले. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने चांगली फलंदाजी केली होती. 338 धावांचं आव्हान दिल्यानंतर सगळ्यांना वाटलं की हे कठीण आहे. मलाही वाटलं. पण जेव्हा शेवटच्या 10 मिनिटे ऑस्ट्रेलिया ज्या पद्धतीने फलंदाजी केली. त्यावरुन मला वाटलं की 20 धावा कमी आहेत. मी माझ्या सहकाऱ्यांनाही बोललो ऑस्ट्रेलियाने 20 धावा कमी केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने 338 धावांचा आव्हान दिल्यानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये आले. मी शांत होतो. We Need One More Run Then Australia To Qulify Final, असं मी बोर्डावर लिहिलं. आणि ती एक धाव जास्त केली आणि फायनलमध्ये भारताने प्रवेश केला.
फायनलआधी अमोल मुझुमदार टीम इंडियातील खेळाडूंना काय म्हणाले?
फायनलआधी मी टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलं की, आपण 30 ऑक्टोबरसाठी मेहनत केलेली नाही, 2 नोव्हेंबरसाठी मेहनत केली आहे. त्यामुळे 30 ऑक्टोबरमधून बाहेर येणं गरजेचं होतं. आता पुढील आव्हान होतं, हे मी सगळ्यांना पटवून सांगितलं, असं अमोल मुझुमदार म्हणाले. फायनलच्या सकाळी अनेक गोष्टी होत्या. पाऊस पडत होता, अनेक निर्णय घ्यायचे होते. एका निर्णयामुळे नको ते व्हायला नको, असं वाटत होतं. यानंतर मैदानात मी 2 मिनिट सर्व खेळाडूंसोबत बोललो, असं अमोल मुझुमदार म्हणाले.
अमोल मुझुमदारांनी सांगितला मजेशीर किस्सा-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदा आम्ही कसोटी सामना खेळत होतो. ऋचा घोष कसोटीत पदार्पण करत होती. यावेळी ऋचा घोष 40-50 धावांवर असताना मला समजलं ती नको ते फटके मारत होती. त्यानंतर मी संघातील खेळाडू हरलीनला बोलावलं आणि सांगितले मैदानात जाऊन ऋचाला सांग रिलॅक्श नको होऊस. पण काही कारणास्तव हरलीन हा मेसेज देण्यासाठी ऋचा घोषकडे जाऊ शकली नाही. त्यानंतर हरलीन सीमारेषेवर असताना ऋचाला ओरडून सांगितलं की ऋचा रिलॅक्श होऊन खेळ…आणि मी तिच्याकडे बघतचं बसलो कारण हरलीन परस्पर विरोधी बोलली, असा गंमतीशीर किस्सा अमोल मुझुमदार यांनी सांगितले.
लॉरा वॉल्व्हार्डबद्दल अमोल मुझुमदार काय म्हणाले?
फायनलमध्ये दक्षिण अफ्रिका संघाची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड एकतर्फी फलंदाजी करत होती. ती मैदानात खेळत होती, तोपर्यंत भारताच्या हातातून विश्वचषक जातोय की काय, असं सगळ्यांना वाटत होतं. याच मुद्द्यावर अमोल मुझुमदार यांना एबीपीच्या महाकट्ट्यावर प्रश्न विचारण्यात आला. लॉरा वॉल्व्हार्ड फलंदाजी करत असताना मीही तिची फलंदाजी पाहात होतो. ती बाद होणार आहे की नाही, विश्वचषक सोडणार आहे की नाही?, असा प्रश्न मलाही पडला. पण 100 धावा झाल्यानंतर लॉरा वॉल्व्हार्ड एकतरी संधी देईल आणि शेवटी तिने दिला आणि ती संधी टीम इंडियाने हेरली आणि लॉरा वॉल्व्हार्ड बाद झाली, असं अमोल मुझुमदार म्हणाले.
महिला विश्वचषक टीम कशी घडली? मुझुमदार यांनी A TO Z सांगितलं, VIDEO:
आणखी वाचा
Comments are closed.