पुण्यात भर सभेत अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, दादांचा विनोदी इशारा; म्हणाले….
अजित पवार : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज (दि. 01 डिसेंबर) अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) हे आज दिवसभर प्रचार सभा घेणार आहेत. त्यातच पुण्याच्या (Pune News) राजगुरुनगर येथील सभेत एक मनोरंजक प्रसंग घडला. राजगुरुनगर (Rajgurunagar) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्याला विनोदी इशारा दिल्याचे पाहायला मिळाले.
Ajit Pawar : नेमकं काय घडलं?
पुण्याच्या राजगुरुनगर येथील सभेत एका कार्यकर्त्याने भाषणादरम्यान अजित पवारांचा उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री असा केला. यामुळे क्षणभर वातावरणात हलकीशी खसखस पिकल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्याने अजित पवारांना “राज्याचे मुख्यमंत्री” म्हणताच “मला उपमुख्यमंत्री म्हणा, मुख्यमंत्री नाही.” असा विनोदी इशारा अजित पवारांनी कार्यकर्त्याला दिला. यावेळी वातावरण आणखी रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले.
अजित पवार : प्रशासन मला टरकून राहतं, अजितदादा असं का म्हणाले?
अजित पवार भाषणात म्हणाले की, माणुसकी म्हणून जगत असताना जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. हुतात्मा राजगुरू यांचं बलिदान भारतातील कोणीच विसरु शकत नाही. या विचारांवर आपण पुढं जातोय. मी कामाचा माणूस आहे, माझी प्रशासनावर पकड आहे. मात्र काही लोकं माझ्यावर आरोप करतात. मी असा आहे, तसा आहे, 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. पण मी एक रुपयांचा मिंदा नाही. तुम्ही दाखवून द्या, की मी कामं करताना कोणाकडून पैसे घेतले. किंवा चिरीमिरी द्यावी लागली. उलट प्रशासन मला टरकून राहतात, असे त्यांनी म्हटले.
Ajit Pawar : अजित पवारांचे अप्रत्यक्षपणे प्रलोभन, म्हणाले…
अजित पवार पुढे म्हणाले की, येत्या हिवाळी अधिवेशनात तुमचा प्रश्न मार्गी लावतो. आता आचारसंहिता असल्यानं मला स्पष्टपणे बोलता येणार नाही. मात्र, या अधिवेशनात तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी किती निधी लागेल, त्यासाठी काय करावं लागेल. हे पाहतो. पण आचारसंहितेमध्ये मला यावर बोलता येणार नाही. तुम्ही माझं ऐकलं तर मी तुमचं ऐकेन. परत म्हणाल मी दम दिला. म्हणून तुम्ही माझी विनंती ऐकली तर मी तुमची विनंती ऐकेन, असे म्हणत अजित पवार यांनी उपस्थितांना अप्रत्यक्षपणे प्रलोभन दिल्याचे पाहायला मिळाले.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.