रोहित-विराटची 2027 वर्ल्डकपमधील जागा फिक्स झालीय, निवड समितीच्या माजी अध्यक्षांचा मोठा दावा
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकला आहे. पहिल्या मॅचमध्ये रोहित शर्मानं अर्धशतक केलं तर विराट कोहलीनं शतकी खेळी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं चॅम्पियन्स ट्रॉफी, ऑस्ट्रेलियातील वनडे मालिका आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी सुरु ठेवली आहे. रोहितनं ऑस्ट्रेलियात तिसऱ्या वनडे शतक केलं होतं.
Rohit Sharma Virat Kohli : रोहित-विराटबाबत के. श्रीकांत म्हणतात…
विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत शतक केलं आहे. दोघांची चांगली कामगिरी पाहता भारताचे माजी सलामीवीर आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णमच्चारी श्रीकांत यांनी मोठा दावा केला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय भारतीय संघ 2027 चा वनडे वर्ल्ड कप जिंकू शकत नाही, असं के. श्रीकांत यांनी म्हटलं.
कृष्णमच्चारी श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटलं की, विराट कोहली आणि रोहित शर्मा एका वेगळ्याच स्तरावर खेळत आहेत. या दोघांशिवाय 2027 चा वनडे वर्ल्ड कपचे प्लॅन यशस्वी होणार नाहीत. तुम्हाला एका बाजूला रोहित शर्मा आणि दुसऱ्या बाजूला विराट कोहलीची आवश्यकता आहे. त्यामुळं याबाबत प्रश्न विचारले जाऊ नयेत, असं के. श्रीकांत यांनी म्हटलं.
के. श्रीकांत पुढं म्हणाले की रांचीमध्ये यांच्या भागीदारीनं दक्षिण आफ्रिकेला मानसिक धक्का दिला होता. ते पुढं म्हणाले, जर रोहित शर्मा आणि विराट कोहली 20 ओव्हरपर्यंत फलंदाजी करु शकले तर विरोधी संघ पराभूत होतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हेच झालं. खरंच ते या दोघांच्या फंलदाजीमुळं सामन्यातून बाद झाले होते, असं के. श्रीकांत म्हणाले.
रोहित शर्मा आणि विराट कोहली एकाच फॉरमॅटमध्ये खेळत असूनही त्यांची कटिबद्धता आणि फिटनेस पाहता सर्व तर्क वितर्क संपवले पाहिजेत. श्रीकांत पुढं म्हणाले की दोघांनी खूप मेहनत केली आहे. ते फक्त एका फॉरमॅटमध्ये खेळत आहेत त्यामुळं अशा प्रकारची मानसिकता काय ठेवणं सोपं नसतं. माझ्या मते त्या दोघांनी 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी संघात जागा निश्चित केली आहे. त्यांच्याशिवाय आपण जिंकू शकत नाही, असं के. श्रीकांत म्हणाले.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कॅप्टन, विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा,कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ – टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, रुबिन हरमन, केशव महाराज, टोनी डी झॉर्झी, रायन रिकेल्टन, मार्को जॅन्सन, एडन मार्कराम, लुंगी एनगिडी, प्रेनेलन सुब्रायन
भारत दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचं वेळापत्रक
30 नोव्हेंबर : पहिली वनडे , रांची, भारत विजयी
3 डिसेंबर : दुसरी वनडे, रायपूर
6 डिसेंबर : तिसरी वनडे, विशाखापट्टणम
आणखी वाचा
Comments are closed.