हेमंत क्षीरसागर याचंं ठरलं, संदीप क्षीरसागर यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
बीड : आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांनी मोठा निर्णय घेतल्यानं नगरपालिका निवडणुकीत नवे राजकीय समीकरण तयार झालं आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज हेमंत क्षीरसागर यांनी त्यांचे भाऊ संदीप क्षीरसागर यांना पाठिंबा दिला आहे.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे योगेश क्षीरसागर यांना नगरपालिका निवडणुकीत पाठिंबा दिल्यानंतर निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागरांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका एबीपी माझाशी बोलताना जाहीर केली.
मागील बीड नगरपालिका निवडणुकीत हेमंत क्षीरसागर यांनी महत्त्वाची भूमिका बजावून उपनगराध्यक्ष पद मिळवले होते. मात्र, काका जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेनंतर शेवटच्या दिवशी त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांनी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभे केलेल्या उमेदवार स्मिता वाघमारे यांना पाठिंबा देऊन नवे राजकीय समीकरण निर्माण केले आहे.
Hemant Kshirsagar : हेमंत क्षीरसागर काय म्हणाले?
आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यावर्षी बीडची नगरपालिका निवडणूक पाहिली तर सर्वसमावेशक चेहरा हा स्मिता वाघमारे म्हणून बीड शहरात समोर येत आहे. स्मिता वाघमारे यांचे आणि आमचे अनेक वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध आहेत. विष्णू वाघमारे आणि माझे गेल्या 15 वर्षांपासून वैयक्तिक संबंध आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे. सर्व मित्र परिवार, प्रत्येक मित्र परिवारातील सहकारी आपण काय करायचं असं म्हणत होते. विष्णू वाघमारे 25 वर्षांपासून बीड शहरात काम करत आहेत. सर्व सामान्यांच्या मुलभूत गरजांसाठी ते कामी येऊ शकतात, त्यामुळं त्यांना मदत करायचं ठरवलं आहे.
आमचे काका जयदत्त क्षीरसागर मोठे नेते आहेत. अनुभवी नेते आहेत पण लोकशाही आहे, त्यांच्या निर्णयाबाबत काही बोलू शकत नाही. मात्र, आम्ही आता स्मिता वाघमारे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत अनेक पक्ष, अनेक उमेदवार रिंगणात आहेत, अशावेळी मतदार काम करणारे चेहरा पाहून मतदान करतील, असं हेमंत क्षीरसागर म्हणाले.
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व शिवसेना (उबाठा) पक्षाच्या बीड नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी स्मिता विष्णु वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपनं डॉ. ज्योतीताई घोमरे (घुंबरे) यांना उमेदवारी दिली आहे. तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रेमलता दादासाहेब पारवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं बीडची निवडणूक रंगतदार बनली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.