देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊतांची भेट, आशिष शेलारही उपस्थित; चर्चांना उधाण, नेमकं कारण काय?


संजय राऊत यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट झाल्याची माहिती समोर झाली आहे. खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांच्या मुलाच्या लग्नात संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट (Sanjay Raut Meets Devendra Fadnavis) झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. (Maharashtra Politics News)

संजय राऊत (Sanjay Raut) यांना काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराचे निदान झाले होते. संजय राऊत यांनी स्वत: सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. या आजारावर उपचार करण्यासाठी संजय राऊत यांनी काही दिवस सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचेही सांगितले होते. परंतु, संजय राऊत यांची प्रकृती अपेक्षेपेक्षा लवकर सुधारत असल्याने गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी काही कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबईतील एका संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाहसोहळा होता. या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित आहे. यावेळी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांशी चर्चा केल्याचे समजते. (Sanjay Raut Meets Devendra Fadnavis)

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी, संजय राऊतांची प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले होते. ते लवकरच राजकारणात पुन्हा सक्रिय होतील, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यानंतर संजय राऊत हे घरात राहूनच सोशल मीडियावरुन राजकीय घडामोडींवर भाष्य करताना दिसून आले होते. आज मनसेप्रमुख राज ठाकरे हेदेखील संजय राऊत यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. (Maharashtra Politics News)

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात जवळपास 15 मिनिटे हसतखेळत- (Sanjay Raut Meets Devendra Fadnavis)

कालच्या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात जवळपास 15 मिनिटे हसतखेळत चर्चा सुरु होती. यावेळी आशिष शेलार हेदेखील उभय नेत्यांच्या बाजूला बसले होते. उद्धव ठाकरे हेदेखील राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नाला आले होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली की नाही, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.