निलेश घायवळच्या अडचणी आणखी वाढणार? पोलिस रेड कॉर्नर नोटीस जारी करणार; लवकरच ताब्यात घेण्याची तय
पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) टोळीवर पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणात अजय सरोदे आणि बटाऱ्या चौधरी या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून परवानाधारक शस्त्र तसेच सुमारे 150 रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत. तपासात एकूण 400 काडतुसे वापरल्याचे समोर आले आहे. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या उपस्थितीत सोनगाव येथे बैलपोळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फायरिंग करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे खरेदी करून बेकायदेशीर सराव केल्यामुळे पोलिसांनी गंभीर गुन्हा नोंदवला आहे. (Pune News)
Nilesh Ghaywal: रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची तयारी सुरू
पुणे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोदे हा निलेश घायवळचा जवळचा माणूस असून त्याने नगरमधील एका संस्थेत विशेष प्रशिक्षण घेतले होते. अजय सरोदे सोबत आणखी एक आरोपीही अटकेत आहे. या आरोपींनी येरवडा हद्दीत बनावट पत्ता दाखवून शस्त्राचा परवाना मिळवला होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. निलेश घायवळ फरार असून पोलिसांनी आधी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती. आता त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची तयारी सुरू आहे. याबाबत गुन्हे शाखा, सीबीआय आणि इंटरपोल यांच्याशी पत्रव्यवहार पूर्ण झाला आहे. लवकरच अधिकृतरीत्या रेड कॉर्नर नोटीस लागण्याची शक्यता आहे.(Pune Crime News)
घायवळ टोळीवर पोलिसांनी मोठी घेराबंदी केली असून त्याचे अनेक साथीदार ताब्यात घेतले आहेत. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ या दोघांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Nilesh Ghaywal: गुन्हे शाखा, सीबीआय, इंटरपोल यांच्याशी पत्रव्यवहार
नगरमधील एका इन्स्टिट्यूटमधून ट्रेनिंग या आरोपींनी घेतले आहे, याबाबतचा सखोल तपास सध्या अधिक तपास पोलिस करत आहेत. सरोदे हा घायवळचा नबरकारी आहे, सरोदे सोबत अजून एक आरोपी अटक करण्यात आले आहे, निलेश घायवळला परदेशात पकडण्यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस पाठवली होती,आता रेड कॉर्नर नोटीस पाठवण्याची तयारी सुरू आहे, गुन्हे शाखा, सीबीआय, इंटरपोल यांच्याशी पत्रव्यवहार केला असून त्याला लवकरच रेड कॉर्नर नोटीस इशू करण्यात येईल. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांना लवकरच पोलिस अटक करतील, कानून के हात लंबे होते हैं, पोलिसाच्या हातून कोणी आरोपी सुटणार नाही, घायवळ जवळचे अनेक आरोपी आता ताब्यात घेतले आहे. याबाबत निलेश घायवळ याच्यावर पोलिस आणखी एक गुन्हा दाखल करण्याची तयारीत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.